Video : फेसाळता धबधबा, पुलावरून धावणारी रेल्वे, डोळ्याला सुखावणारा दुधसागर धबधबा…

| Updated on: Jul 24, 2022 | 5:09 PM

एक सुंदर व्हीडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. दुधसागर धबधब्याचं सौंदर्यदर्शन घडवण्यासाठी हा व्हीडिओ पुरेसा आहे.

Video : फेसाळता धबधबा, पुलावरून धावणारी रेल्वे, डोळ्याला सुखावणारा दुधसागर धबधबा...
Follow us on

गोवा : सध्या सगळीकडे पावसाची रिमझिम सुरू आहे. अश्यात अनेकजण वर्षा पर्यटनाटा पर्याय निवडत आहेत. पर्यटकाच्या पहिल्या पसंतीला गोवाच उतरतंय. समुद्रकिनारा, शांतता आणि वेस्टर्न फील सोबतच इथे बरंच काही गोव्यात अनुभवता येतं. पर्वत, झाडे-झाडे, धबधबे, अशा कितीतरी सुंदर बाबी पर्यटकांना गोव्याकडे आकर्षित करतात. त्यात दूधसागर धबधबा तर अनेक त्यात भर घालतो. पावसाळ्यात दुधसागर धबधबा (Dudhsagar Waterfall) आणखीच सुंदर दिसतो. तिथला निसर्ग पर्यकांना खुणालत राहातो. तिथले अनेक व्हीडिओ सोशल मीडियावर (Social Media) पाहायला मिळतात. असाच एक सुंदर व्हीडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. दुधसागर धबधब्याचं सौंदर्यदर्शन घडवण्यासाठी हा व्हीडिओ पुरेसा आहे.

व्हायरल झालेल्या व्हीडिओमध्ये दूधसागर धबधबा दुरून दिसत आहे. त्याचं फेसाळतं पाणी इतके पांढरेशुभ्र आहे की जणू दूध! त्याचमुळेया धबधब्याला दुधसागर धबधबा म्हणतात. हा धबधबा उंच डोंगरातून बाहेर पडतो. आजूबाजूला भरपूर हिरवळ आहे.धबधब्याचं पाणी कोसळत खाली येते.या सगळ्या निसर्गाच्या समोर आणखी एक बाब आकर्षित करते ती म्हणजे इथून जाणारी रेल्वे… एक पूल दिसतो जो प्रत्यक्षात रेल्वे ट्रॅक आहे. या रेल्वे ट्रॅकवरून एक रेल्वेही जाताना दिसत आहे. धबधब्याचं पाणी वरून खाली येत आहे आणि तिथेच असलेल्या पुलाच्या खालून बाहेर येत आहे. हा नजारा खूप सुंदर दिसत आहे. हा व्हीडिओ सध्या अनेकांची मनं जिंकत आहे.

हे सुद्धा वाचा

हा व्हीडिओ पाहून दुधसागर धबधबा बघण्यासाठी जाण्याचा मोह झाला नाही तरच नवल! धबधब्याजवळून ट्रेन जात असताना ती स्वर्गसुखाचा आनंद होतो. @AnkitaBnsl नावाच्या ट्विटर हँडलवरून हा व्हीडिओ शेअर करण्यात आला आहे. तो आतापर्यंत 1.5 दशलक्ष पेक्षा जास्त लोकांनी पाहिलं आहे. त्याचबरोबर या व्हिडिओला 40 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केलं आहे. सोशल मीडिया यूजर्स या व्हीडिओला चांगलीच पसंती देताना दिसत आहेत. या व्हीडिओ बऱ्याच कमेंट पाहायला मिळत आहेत. तर अनेकांनी त्याला रिट्विटही केलं आहे.