मुंबई : आजपासून (11 मे) गुगलने आपलं नवं धोरण जारी लागू केलं आहे. त्यानुसार आता प्ले स्टोअरवरील (Google Play Store) सर्व कॉल रेकॉर्डिंग अॅप्सवर बंदी (Call Recording Apps Ban) घालण्यात आली आहे. याबद्दल गुगलने गेल्या महिन्यातच घोषणा केली होती. त्यानुसार आजपासून धोरणाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे, त्यामुळे आजपासून प्ले स्टोअरवरून कोणतंही कॉल रेकॉर्डिंग app डाउनलोड करता येणार नाही.कॉल रेकॉर्डिंग अॅप हे युझर्सच्या गोपनीयतेसोबत भंग करत असल्याचं गुगलचं म्हणणं आहे. त्यामुळे गुगल कॉल रेकॉर्डिंग app आणि त्यांच्या सर्व्हिसच्या विरोधात आहे. पण जर तुमच्या फोनमध्ये इनबिल्ट कॉल रेकॉर्डिंगची सुविधा देण्यात आली असेल, तर तुम्ही पूर्वीप्रमाणेच कॉल रेकॉर्ड करु शकाल.
अनेक असे अॅप आहेत की त्यावरून कॉल रेकॉर्डिंग सुरू झाली की तेव्हा दोन्ही बाजूंच्या वापरकर्त्यांना त्याची माहिती दिली जाते. हे दोन्ही बाजूच्या बोलणाऱ्यांना स्पष्टपणे ऐकू जातं. गुगलने आजपासून नवं धोरण समोर आणलं आहे. यानुसार आजपासून थर्ड पार्टी कॉल रेकॉर्डिंग अॅपद्वारे युझर्सचे कॉल रेकॉर्ड करता येणार नाहीत. पण ज्या फोनमध्ये इनबिल्ट रेकॉर्डिंग फीचर देण्यात आलं आहे त्या मोबाईलवरून कॉल रेकॉर्डिंग सहज करता येणार आहे. त्यावर या धोरणाचा कोणताही परिणाम होणार नाही.
जर तुम्हाला फोन रेकॉर्ड करायची सवय असेल तर काळजी करू नका. काही फोनमध्ये आजही फीचर इनबिल्ट रेकॉर्डिंग केलं जाऊ शकतं. यामध्ये शाओमी, रेडमी, एमआय, सॅमसंग, ओप्पो, पोको, वनप्लस, रियलमी, वीवो आणि टेक्नो यांचा समावेश आहे.
असं जरी असलं तरी भारतात मात्र यात काही प्रमाणात सूट आहे. एखाद्या देशात कॉल रेकॉर्डिंग कायदेशीर आहे की नाही यावर देखील रेकॉर्डिंग कार्यक्षमता अवलंबून असणार आहे. भारतात सध्या कॉल रेकॉर्ड केले जाऊ शकतात.