आंध्र प्रदेशमधून एक खूप आश्चर्यकारक घटना समोर आलोय. ही घटना फारच चकित करणारी आहे. इथे एका महिलेने आपल्या पतीचं लग्न त्याच्या एक्स गर्लफ्रेंड सोबत लावून दिलंय. आहे की नाही चकित करणारी घटना? लग्न लावून तर दिलंच पण या महिलेला ते तिघे सोबत राहण्यावरही आक्षेप नाही. या महिलेनं आपल्या पतीचं त्याच्या एक्स गर्लफ्रेंडशी लग्न केलं आहे आणि आता हे तिघेही एकाच घरात एकत्र राहणार असल्याचं त्यानं ठरवलं आहे. या महिलेने स्वत: आपल्या पतीचे लग्न एक्स गर्लफ्रेंडसोबत लावून देण्याची सर्व व्यवस्था केलीये. ही घटना सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. या अनोख्या प्रेमकहाणीबद्दल जाणून लोक आश्चर्यचकित झाले आहेत.
‘टाइम्स नाऊ’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, तिरुपतीच्या डक्कलीच्या आंबेडकर नगरमधील आहे हे प्रकरण सध्या बरंच गाजतंय.
विमला नावाच्या महिलेने पती कल्याणचे लग्न त्याची एक्स गर्लफ्रेंड नित्या श्री शी लावून दिलंय. पती कल्याण एक प्रसिद्ध यूट्यूबर आहे. विमला आणि कल्याण यांची भेट काही वर्षांपूर्वी झाली. या भेटीचं रुपांतर आधी मैत्रीत आणि नंतर मैत्रीचं प्रेमात झालं. त्यानंतर कल्याण आणि विमला यांनी एकमेकांशी लग्न केलं.
लग्नाच्या काही वर्षांनंतर नित्या श्री नावाच्या मुलीने कल्याणच्या आयुष्यात पुन्हा प्रवेश केला होता. ही तीच मुलगी जिच्याशी कल्याणचं काही वर्षांपूर्वी ब्रेकअप झालेलं. त्यांनंतरच कल्याणने विमलाशी लग्न केलं होतं. नित्या श्री परत आल्यानं विमलाला पती कल्याणच्या वागण्यात थोडा बदल जाणवतो.
नित्या श्री ला कल्याणच्या लग्नाची माहिती मिळताच ती त्याच्या घरी पोहोचते. नित्या श्रीने विमलाला हात जोडून कल्याणशी लग्न करण्याची परवानगी मागितली. विवाहानंतर हे तिघेही एकाच छताखाली एकत्र राहतील, असा प्रस्तावही नित्या श्रींनी विमलाला दिला.
थोडा वेळ घेतल्यानंतर विमलाने नित्या श्रीचा प्रस्ताव मान्य केला आणि आपल्या पतीचे लग्न त्याच्या एक्स गर्लफ्रेंडसोबत लावून दिले.