फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, व्हॉट्सॲपवर असे अनेक व्हिडिओ असतात जे लोक वारंवार शेअर करत असतात. असाच एक व्हायरल व्हिडिओ ही आम्हाला मिळाला आहे. हा व्हिडिओ आजी आणि नातवाचा आहे. जिथे आजी आपल्या नातवाची नजर काढताना दिसतीये. जे पाहिल्यानंतर तुमचा दिवस नक्कीच चांगला होईल. आपण अनेकदा घरातील मोठ्यांना असे म्हणताना ऐकले असेल की मूल आजारी असेल किंवा अस्वस्थ असेल तर त्याचे कारणही दिसू शकते. त्यामुळे घरातील ज्येष्ठ मंडळी औषधापूर्वी नजर काढण्याचा आधार घेतात. विज्ञानावर आपला कितीही विश्वास असला तरी धर्मग्रंथांत लिहिलेल्या गोष्टी पूर्णपणे नाकारता येत नाहीत.
मुलं नातवंडं असतील तर हे प्रेम आणखीनच वाढतं. आपल्या नातवाला नजरच लागली असेल असंच आजीला वाटत असतं. आता पाहा हा व्हिडिओ जिथे एक आजी आपल्या नातवाची नजर काढताना दिसत आहे.
या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, वृद्ध महिला मुलासोबत बसलेली दिसत आहे. ही क्लिप पाहिल्यावर असे वाटते की ती वृद्ध महिला मुलाची आजी आहे! मूल त्यांच्याकडे येताच ती स्वयंपाक थांबवते आणि त्याची नजर काढायला सुरुवात करते.
हा व्हिडिओ पाहिला तर असेही दिसून येते की, आजही भारतीय संस्कृतीत वृद्ध मुलांवरील वाईट नजर दूर करण्यासाठी आधीपासूनच अवलंबलेल्या पद्धतींचा अवलंब करतात. नजर काढणं चूक की बरोबर हा वेगळा विषय आणि आजीचं प्रेम हा वेगळा विषय.
दवा काम ना आए तो नजर भी उतारती है,
ये मां है साहब, हार कहां मानती है…❤️https://t.co/0K24Kq6Q5p pic.twitter.com/B5sdXvKrqm— Mahant Adityanath 2.0? (Parody) (@MahantYogiG) January 31, 2023
@MahantYogiG नावाच्या अकाऊंटने हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. सात लाखांहून अधिक लोकांनी ही बातमी पाहिली आहे आणि त्यावर कमेंट करून आपली प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहिले की, “प्रेम किती देते, सर्वात वाईट नजर काढून टाकते.”