सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी लोक काहीही करू शकतात. ज्याचा कोणी विचारही करू शकत नाही असं काही करून लोक मोकळे होतात. दिल्लीतील कनॉट प्लेसमध्ये कंटेंट क्रिएटर्सची गर्दी होत असते पण आता तेच लोक अध्येमध्ये मेट्रो मध्येही व्हिडिओ शूट करतात. नुकताच एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामुळे लोकांना धक्काच बसलाय. ‘भूल भुलैया’ या बॉलिवूड चित्रपटात मंजुलिकाची भीतीदायक व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री विद्या बालनची एका मुलीने नक्कल केली आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तिला पाहून मेट्रोत बसलेले लोक घाबरलेले दिसत आहेत.
हा व्हिडिओ नोएडा मेट्रोचा आहे, जिथे एक मुलगी ‘भूल भुलैया’ चित्रपटाची मंजुलिका बनून मेट्रोमध्ये उपस्थित लोकांना घाबरवत होती.
व्हिडिओ लोकांसमोर येताच तो लगेच व्हायरल झाला. मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ रविवारचा असल्याचं सांगितला जात आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आली आहे.
सध्या या व्हायरल व्हिडिओची चौकशी सुरू असून लवकरच कडक कारवाई करण्यात येईल, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.
या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, मुलीने पिवळ्या आणि लाल रंगाची साडी परिधान केली असून तिच्या चेहऱ्यावर मंजुलिकासारखा भीतीदायक मेकअप आहे.
मेट्रोच्या आत बसलेल्या लोकांना ती आरडाओरडा करून घाबरवत आहे. ती मेट्रोच्या आत लोकांकडे जात असल्याने लोक तिच्यापासून दूर पळत आहेत.
सोशल मीडियावरील अनेक मीम्स पेजनेही हा व्हिडिओ शेअर केला आहे. या घटनेनंतर जेव्हा लोकांची चर्चा झाली तेव्हा अनेकांनी मेट्रोही सुरक्षित नसल्याचं म्हटलं. मिळालेल्या माहितीनुसार, नोएडा ते ग्रेनो या ॲक्वा लाइन मेट्रोमध्ये हा व्हिडिओ बनवण्यात आला आहे.