हरिद्वार: LLB च्या पेपरसाठी एक नवरदेव थेट कॉलेजमध्ये गेला आणि त्याची वधू कारमधून बाहेर थांबली, असे मनोरंजक दृश्य हरिद्वारमध्ये पाहायला मिळाले. परीक्षा संपताच नवरदेव बाहेर आला तेव्हा वधूच्या चेहऱ्यावर एक वेगळंच हसू दिसत होतं. कारण तिच्या नवऱ्याने आपल्या नव्या आयुष्याची तसेच भविष्याची चिंता करत LLB चा पेपर दिला होता. हरिद्वार श्यामपुर मधील रहिवासी तुलसी प्रसाद यांचा विवाह हरियाणाच्या हिसार मध्ये झाला. एलएलबीचा पेपर असल्याने नवरदेव घरी गेला नाही आणि आधी एलएलबीचा पेपर द्यायला गेला.
तुळशी प्रसाद सांगतात की माझं लग्न हिसारमध्ये झालं, पण दुसऱ्या दिवशी माझा एलएलबीचा पेपर होता, मी सरळ घरी गेलो असतो तर आम्हाला उशीर झाला असता, म्हणून मी पेपर द्यायला कॉलेजमध्ये आलो.
लग्नाचे विधी आता घरी जाऊन पूर्ण होतील. ते म्हणतात की लग्नाच्या कपड्यात पेपर दिल्यावर मला काहीतरी विचित्र वाटलं, पण पेपर देणंही गरजेचं होतं.
पूर्णानंद तिवारी लॉ कॉलेज चे मुख्याध्यापक अशोक कुमार तिवारी यांनी सांगितलं की पेपर देणारा नवरदेव एलएलबी च्या 5 व्या सत्रातील पेपर देत होता. जर त्याने पेपर सोडला असता तर त्याचे एक वर्ष वाया गेले असते, म्हणून त्याने लग्नाच्या कपड्यात पेपर देण्याची परवानगी मागितली.
मुख्याध्यापक पुढे म्हणाले की, तुळशी प्रसाद लग्नानंतर त्याच्या घरी गेला नाही आणि पेपर देण्यासाठी थेट कॉलेजमध्ये गेला. नव्या आयुष्याची सुरुवात होताच पहिल्या पेपरला त्यांचं प्राधान्य होतं. ही खूप चांगली गोष्ट आहे. तुळशी प्रसाद यांनी विवाहबंधनात अडकल्यानंतर आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात केली.त्याच्या या कृतीचे सर्व लोकांनी कौतुक केले, कारण तुळशी प्रसाद हे त्यांचे नवीन जीवन तसेच त्यांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी हा पेपर देण्यासाठी आले होते.