Guinness World Records ने आठवड्यातला सर्वात वाईट दिवस घोषित केलाय! कोणता असेल?

| Updated on: Oct 18, 2022 | 3:39 PM

सगळं बघून शेवटी आता गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड्सने ठरवलं की काय ते एकदाचा टॅग देऊन टाकू.

Guinness World Records ने आठवड्यातला सर्वात वाईट दिवस घोषित केलाय! कोणता असेल?
week days
Image Credit source: Social Media
Follow us on

जसा सोमवार येतो लोकांच्या अंगावर काटा येतो. इतकं कुणीच बदनाम नसेल जितका सोमवार बदनाम आहे. शिवाय इतके कुणावरच मिम बनत नसतील जितके सोमवार बनतात. तुम्ही सांगा, तुमच्या सुद्धा ओळखीत असा एक कमीत कमी व्यक्ती असेल जो सोमवार आला रे आला की त्याचं मिम पोस्ट करत असेल. नाहीका? शनिवार रविवार कसे जातात आणि कसा सोमवार पटकन येतो याचं काय उत्तर अजूनही कुणाला सापडलेलं नाही बुआ. बिचारा तो सोमवार, प्रत्येक जण उठतो आणि त्या सोमवारला शिव्या घालतो. हे सगळं बघून शेवटी आता गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड्सने ठरवलं की सोमवारला काय ते एकदाचा टॅग देऊन टाकू .

आता गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने सोमवारचा दिवस आठवड्यातला सर्वात वाईट असल्याचं घोषित केलंय. गिनीजने एक ट्विट केलं आहे, ज्यावर लोक आपल्या प्रतिक्रिया देतायत.

गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने सोमवारी एक ट्विट टाकलं जे बघून काहींना समाधान वाटलं, काहींना आश्चर्याचा धक्का बसला तर काही हसून लोटपोट झाले.

गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने लिहिले आहे की, “आम्ही अधिकृतपणे सोमवारला आठवड्यातील सर्वात वाईट दिवस म्हणून नोंदवत आहोत.” लोकांनीही या पोस्टवर मजेशीर प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली.

गिनीजचं ते ट्विट

एका व्यक्तीने तर गिनीज ला रिप्लाय देताना म्हटलं, ” मी याच कारणासाठी सोमवारी सुट्टी घेतो” गिनीजनेही प्रतिक्रिया देत हा निर्णय स्मार्ट असल्याचं म्हटलंय.

लोकांच्या प्रतिक्रिया