अहमदाबाद: अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने दिल्ली महापालिकेच्या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला. या विजयानंतर गुजरात आणि हिमाचल प्रदेशातील आपच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं. गुजराजमध्ये सुरुवातीपासूनच भाजप आघाडीवर आहे. तर काँग्रेसची अवस्था अत्यंत बिकट दिसतेय. दिल्ली महापालिकेच्या निवडणुकीत भाजपकडून सत्ता खेचून घेणारी आम आदमी पार्टी गुजरातमध्ये फारशी कामगिरी करताना दिसत नाहीये. गुजरातमध्ये आप 6 हून अधिक जागांवर आघाडीवर आहे तर हिमाचल प्रदेशमध्ये आपला खातंही उघडला आलं नाही. यावरूनच सोशल मीडियावर असंख्य मीम्स व्हायरल होत आहेत.
गुजराज निवडणुकीत आपने जोरदार प्रचार केला होता. आप गुजरातचा सर्वांगीण विकार करेल, असं आश्वासन अरविंद केजरीवाल यांनी गुजरातच्या जनतेला दिलं. त्याचप्रमाणे केंद्रातील भाजप सरकारवरही त्यांनी जोरदार टीका केली. तर केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी गुजरातमध्ये आपचा एकही उमेदवार निवडून येणार नाही, असा दावा केला होता.
AAP wave in Gujarat #GujaratElectionResult pic.twitter.com/1pSXwYORVr
— pappu parody (@funnykella) December 8, 2022
(1) Aam aadmi party in delhi MCD election.
(2) Aam aadmi party in Gujarat election. #GujaratElectionResult pic.twitter.com/t8ctFVVZ5Y— Prayag (@theprayagtiwari) December 8, 2022
Joke of The Day. ??
#GujaratElectionResult#MCDResults#ResultsOnAajTak pic.twitter.com/BbSMYkvUc3
— सुयश सिंह #राष्ट्रवादी_शंखनाद (@Real_suyash_69) December 8, 2022
AAP in #GujaratElectionResult pic.twitter.com/wFhETHK6gt
— Gaurav (@grjain) December 8, 2022
Congress and AAP
Today in
#GujaratElectionResult. pic.twitter.com/Z9l6A5Qr5i
— Tanmay ?? (@BeingTanu) December 8, 2022
निवडणुकीचा कल पाहता आम आदमी पार्टीने गुजरातमध्ये आपलं अस्तित्व जाणवून दिलं आहे. त्यामुळे भाजपची ही धोक्याची घंटाही मानली जात आहे. गुजरात निवडणुकीच्या निकालाचे आतापर्यंत आलेल्या निकालावरून भाजप 149 जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस 20 जागांवर आघाडीवर आहे. आम आदमी पार्टी 8 जागांवर तर इतर 5 जागांवर आघाडीवर आहे.
दिल्ली महापालिकेच्या निवडणुकीत आपने सर्वाधिक जागा मिळवल्या होत्या. भाजपची 15 वर्षांची सत्ता संपुष्टात आणून आपने दिल्ली महापालिकेवर झेंडा फडकावला. 2017 च्या तुलनेत यावेळी आपला 90 जास्त जागा मिळाल्या. तर भाजपच्या 64 जागा कमी झाल्या. काँग्रेसच्याही 19 जागांमध्ये घट झाली.