अनेक वेळा तुम्ही लोकांच्या खात्यात चुकून येणाऱ्या पैशांबद्दल ऐकलं असेल, पण आज आम्ही तुम्हाला गुजरातमधील अशा एका व्यक्तीची गोष्ट सांगणार आहोत, ज्याच्याबद्दल ऐकून तुम्हाला धक्का बसेल. या माणसाने असं डोकं लावलं की बँकेत आलेल्या पैशातून त्यांनी काहीच तासांत लाखो रुपये कमावले. हा माणूस गुजराती आहे.
एके दिवशी रमेशभाई सागर नावाच्या व्यक्तीच्या डिमॅट खात्यात चुकून 11,677 कोटी रुपये आले. यानंतर गुंतवणुकीतून त्यांना 5 लाख 65 हजार रुपयांचा नफा झाला.
माध्यमांशी बोलताना रमेशभाई म्हणाले की, रोज सकाळी ते व्यापाराला बसतात. 26 जुलै रोजी तो नेहमीप्रमाणे सकाळी 9.30 वाजता ट्रेडिंगला बसले, काही ट्रेड केले पण बाजार एकदम शांत दिसत होता, म्हणून काही तास वाट पाहिली.त्यानंतर त्यांनी जेव्हा त्यांच्या खात्यात 11 हजार 677 कोटी रुपये दिसत होते. हे पाहून त्यांना धक्काच बसला.
त्या पैशांमधले रमेशभाईंनी 2 कोटी रुपये बाजारात टाकले. रमेशभाईंनी माध्यमांना सांगितले की, त्यांनी यापूर्वी एवढी मोठी गुंतवणूक कधीच केली नव्हती, त्यांनी आतापर्यंत जास्तीत जास्त 25,000 रुपयांची गुंतवणूक केली होती.
रमेशभाई म्हणाले की खात्यात चुकून आलेले पैसे परत जातील याची कल्पना मला होती त्यामुळे मी ते पैसे गुंतवले. ज्याचा फायदा मला झाला. विशेष म्हणजे याच दिवशी बिहारच्या एका माणसाच्या खात्यात सुद्धा बरेच पैसे जमा झाले होते पण त्या व्यक्तीला त्याचा फायदा घेता आला नाही.