आपल्या देशात जेवढा जुगाड सापडतो तेवढा जगात क्वचितच इतरत्र आढळतो. हेच कारण आहे की जेव्हा जेव्हा त्यांच्याशी संबंधित व्हिडिओ इंटरनेटवर येतात तेव्हा ते व्हायरल होतात. या व्हिडिओंची सर्वात खास गोष्ट म्हणजे हा व्हिडिओ सामान्य लोकांनाच नाही तर सुशिक्षित लोकांनाही आश्चर्यचकित करतो. असाच व्हिडिओ सध्या समोर आले आहेत. ज्यामध्ये एक असा जुगाड पाहायला मिळालाय की, पाहून तुम्ही थक्क व्हाल.
तुम्ही सर्वांनी वॉशरूममध्ये लावलेल्या हँड ड्रायरने हात वाळवले असतील. भिंतीवर चिकटलेल्या या मशीनचे एकच काम आहे की ते काही सेकंदात आपले हात कोरडे करते. होना? पण याचा आणखी एक वापर आता समोर आलाय. ज्यामध्ये एक व्यक्ती वॉशरूममध्ये लावलेल्या हँड ड्रायरखाली बसून आपले केस सेट करत होता. त्या व्यक्तीच्या या जुगाडाने युजर्स खूप प्रभावित झाले आहेत. यामुळेच हा व्हिडिओ नुसता बघितला जात नाही तर खूप शेअरही केला जात आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती बाथरूममध्ये बसून हँड ड्रायरच्या मदतीने केस सेट करताना दिसत आहे. त्याच्याकडे बघून समजतं की त्याने हँड ड्रायरला हेअर ड्रायर मानलं आहे आणि तो त्याचा नेमका तसाच वापर करत आहे. आपल्या देशात टॅलेंट कमतरता नाही हे मात्र तितकंच खरंय.
IPS अधिकारी आरिफ शेख (@arifhs1) यांनी आपल्या ट्विटर हँडलवर हा मजेशीर व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्यांनी लिहिले आहे की, “गरज ही अविष्काराची जननी आहे.” यावर युजर्सही प्रतिक्रिया देत आहेत.
Necessity is mother of invention… pic.twitter.com/iJ8J5MxG9x
— Arif Shaikh IPS (@arifhs1) February 2, 2023
एका व्यक्तीने लिहिलं- हँड ड्रायरलाही माझ्या अधिकारांचा गैरवापर होत आहे, असं वाटत असावं. अशा अनेक लोकांच्या मजेशीर कमेंट्स तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता.