पवनपुत्र हनुमान बघता-बघता उंच आकाशात गेले, मोठ्यांसह लहानगे सुद्धा बघत राहिले! VIRAL VIDEO

| Updated on: Oct 27, 2023 | 12:55 PM

हनुमानजी काय थांबत नव्हते ते उंच उंच आकाशात उडतच होते. काही लोकं तर हे दृश्य बघून घाबरले. पण हे नक्की होतं काय? हनुमान जी आपल्यासाठी लहानपणापासूनच एक अद्भुत शक्ती आहे. आता कल्पना करा जर आपल्याला हनुमान प्रत्यक्षात उडताना दिसला तर? कल्पनाच किती भन्नाट आहे ना? हा व्हायरल व्हिडीओ बघा...

पवनपुत्र हनुमान बघता-बघता उंच आकाशात गेले, मोठ्यांसह लहानगे सुद्धा बघत राहिले! VIRAL VIDEO
hanumanjiii
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई: पवनपुत्र हनुमान! पराक्रम, करुणा, शक्ती, भक्ती यासाठी ओळखले जाणारे पवनपुत्र हनुमान! लहानपणी आपण अशा अनेक गोष्टी ऐकलेल्या आहेत ज्यात आपण पराक्रमी हनुमानाला हवेत उडतोय अशी कल्पना केलीये. आपण ऐकायचो खरं पण आपण विचार करायचो, खरंच हनुमान जी हवेत उडत असतील का? खरंच ते आकाशात सूर्याला धरायला गेले असतील का? कार्टून्स बघताना पण आपल्याला हनुमान त्या कार्टून मध्ये उडताना दिसायचे, बघताना मजा यायची. जरा वेळ आपल्यालाही वाटायचं आपल्यालाही उडता आलं तर? हनुमान जी आपल्यासाठी लहानपणापासूनच एक अद्भुत शक्ती आहे. आता कल्पना करा जर आपल्याला हनुमान प्रत्यक्षात उडताना दिसला तर? कल्पनाच किती भन्नाट आहे ना? हा व्हायरल व्हिडीओ बघा…

व्हिडीओ

हे नक्की होतं काय?

एका ठिकाणी सगळी लोकं जमली होती. गर्दीत अचानक पवन पुत्र हनुमान जी हवेत उडायला लागले. आजूबाजूच्या लोकांना आश्चर्याचा धक्काच बसला. त्यांना प्रश्न पडला हे असं कसं? सगळी लोकं त्या हनुमानाकडे बघतच राहिले. कुणी उघड्या डोळ्यांनी बघायला लागलं, कुणी हातात मोबाईल घेऊन शूट करता-करता त्या स्क्रीनवर बघू लागलं. हनुमानजी काय थांबत नव्हते ते उंच उंच आकाशात उडतच होते. काही लोकं तर हे दृश्य बघून घाबरले. पण हे नक्की होतं काय?

लहान मुलांना काय वाटलं असेल?

हा होता हनुमानाचा एक पुतळा. हनुमानाचा हा पुतळा आडवा होता, या पुतळ्याला लोकांनी लावला ड्रोन, मोठा ड्रोन! पुतळा मोठा होता मग त्याला लावलेला ड्रोन देखील तसाच होता. त्या ड्रोनचे पाते सुद्धा या व्हिडीओमध्ये दिसतायत. बघता-बघता हा ड्रोन वर जातो. हनुमान वर जाऊ लागतो. हनुमानाचा हा मोठा पुतळा बघून कुणालाही वाटेल, “बापरे! खरंच हनुमान आहे की काय?”, काहींना तर तो पुतळा नसून माणूस वाटू शकतो. व्हिडीओत बघा, जर मोठ्या लोकांना इतका आश्चर्याचा धक्का बसलाय तर लहान मुलांना काय वाटलं असेल?