प्रचंड मोठा आणि शक्तिशाली हत्ती प्रत्यक्षात कोमलता आणि बुद्धिमत्तेच्या बाबतीत कोणापेक्षाही कमी नाही. हे मोहक आणि मजेदार मोठे प्राणी खूप भारी असतात. या हत्तीचे खूप व्हिडीओ वेगवेगळ्या ठिकाणी शेअर केले जातात. कधी हे हत्ती आपली बुद्धीमत्ता दाखवतात तर कधी आपला गोंडसपणा दाखवतात. त्यामुळे साहजिकच हत्ती कडून खूप शिकण्यासारखे आहे.
हत्तींच्या या गुणांवर भर देत भारतीय प्रशासकीय सेवेतील (IAS) एका अधिकाऱ्याने त्यांचे दोन सुंदर व्हिडिओ पोस्ट केलेत. या व्हिडीओ सोबत त्यांनी खूप गोड पण गहन संदेश ट्विटरवर पोस्ट केलाय.
नवीन वर्ष 2023 अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले असताना, साहूने हत्तींकडून मिळालेल्या जीवनाच्या पाच आवश्यक धड्यांची यादी पोस्ट केलीये.
साहूने या दोन्ही व्हिडिओंना कॅप्शन दिले आहे की, “हत्तींकडून नवीन वर्षाचे धडे: 1. भारी वजन असलं तरी इतरांना भार द्यायचा नाही. २) हुशार असलं तरी दिखाऊपणा करायचा नाही, ३) शक्तिशाली राहा पण चिथावणी मिळेपर्यंत संयमित राहा 4. चिखलात लोळा, बराच वेळ आंघोळ करा, 5. खूप खा, पण लांब चालायलाही जा.”
New Year lessons to learn from elephants
1.Heavy weight but do not throw weight around
2.Intelligent but no show off
3.Powerful but restrained untill provoked
4.roll in mud,take long baths
5. Eat your heart out but take long walks ?@ParveenKaswan do add more #NewYearlessons pic.twitter.com/m3G3AG8ZVj— Supriya Sahu IAS (@supriyasahuias) December 24, 2022
साहू यांनी आयएफएस प्रवीण कासवान यांना टॅग करत ट्विट केले आणि या यादीमध्ये आणखी काही धडे जोडण्यास सांगितले. साहू आणि कासवान अनेकदा वन्यजीवांशी संबंधित ट्विट करतात.
कासवान यांनाही ही यादी पुढे नेण्यास जास्त वेळ लागला नाही आणि हत्तींकडून शिकण्यासारखा सर्वात महत्त्वाचा धडा लिहिला, फॅमिली फर्स्ट अँड फोरमोस्ट’.
Family is first and foremost. #NewYearsLessons pic.twitter.com/LVIvFr0z3o
— Parveen Kaswan, IFS (@ParveenKaswan) December 24, 2022