मुंबई : साऊथ इंडस्ट्रीचा सुपरस्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि अभिनेत्री रश्मिका मंदान्ना यांचा ‘पुष्पा: द राइज’ (Pushpa The Rise Movie) चित्रपट 17 डिसेंबर 2021 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रदर्शित होऊन एक महिन्याहून अधिक काळ लोटला आहे. चाहत्यांना हा चित्रपट जसा आवडला आहे तसेच त्यातील गाण्यांनाही पसंती दिली जात आहे. त्याचे डायलॉग्स आणि डान्स स्टेप्सशी संबंधित अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आता हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि त्याच्या आजीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो ‘तेरी झलक अशरफी श्रीवल्ली…’ चित्रपटातील एका गाण्याच्या डान्स स्टेप्स कॉपी करत आहे. हार्दिक पांड्याची क्रिकेटमध्ये जबरदस्त फॅन फोलोविंग आहे. हार्दीक पांड्याला क्रिकेट जगतात कुंफू पांड्या म्हणून ओळखले जाते. कारण तो एक जबरदस्त फिल्डर तर आहेच, मात्र कधी कधी तो महेंद्रसिंह धोनींसारखा हेलिकॉप्टर शॉटही मारतो, तर कधी सिक्सरचा पाऊस पाडतो. अशा क्रिकेटपटूने आपल्या आजीसोबत श्रीवल्ली हुक स्टेप केली आहे. त्यामुळे हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हार्दिक पांड्या आणि त्याची आजी अल्लू अर्जुनच्या श्रीवल्लीवर सुंदर नृत्य करताना दिसतात. दोघांनीही प्रत्येक टप्प्यावर उत्तम समन्वय साधला आहे. व्हिडीओ शेअर करताना हार्दिक पांड्याने कॅप्शनमध्ये लिहिले – आमच्या स्वतःच्या पुष्पा नानी. हा व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला आहे. तुम्ही hardikpandya93 नावाच्या पेजवर सर्व व्हिडिओ पाहू शकता. लोकांना हा व्हिडीओ एवढा आवडला आहे की त्यांनी तो पुन्हा पुन्हा बघितला आहे, तसेच त्यांच्या लाईक्स आणि कमेंट्सच्या माध्यमातून खूप प्रेमाचा वर्षाव होत आहे.
नेटिझन्सनी या व्हिडिओवर बरेच इमोटिकॉन्स शेअर केले आहेत. एका युजरने लिहिले – खूप गोंडस… तुझ्यावर खूप प्रेम. दुसर्या यूजरने लिहिले – अप्रतिम डान्स, तुम्ही दोघे खूप क्यूट आहात. तिसऱ्या यूजरने लिहिले – हार्दिक, हा सर्वात सुंदर व्हिडिओ आहे. दुसर्याने लिहिले – तुझी आजी खरोखरच गोड आहे. अशा अनेक कमेंटचा या व्हिडिओवर पाऊस पडतो आहे. या व्हिडिओला लाखो लाईक्सही आले आहेत.