मुंबई : देशात कोरोनाचे रुग्ण पुन्हा एकदा लक्षणीयरीत्या वाढत आहेत. देशभरात कोरोना प्रतिंबंधक नियमांचे पालन करण्याचे आवाहन सरकारकडून केले जात आहे. तसेच, कोरोनाला थोपवण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम जलदगतीने राबवण्याच्याही सूचना राज्य पातळीवर दिल्या जात आहेत. देशभरात लसीकरण मोहीम राबवली जात असल्यामुळे अनेकजण आपले नाव नोंदवून लसीचे दोन्ही डोस मिळण्याची वाट पाहत आहेत. नागरिकांच्या याच प्रतिक्षेला घेऊन रामा प्रसाद गोयंका ग्रुपचे (Rama Prasad Goenka Group) अध्यक्ष हर्ष गोयंका (Harsh Goenka) यांनी एक मजेदार व्हिडीओ ट्विट केला आहे. कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस मिळाल्यानंतर अनेकांच्या मनात कशा प्रकारे आनंद झाला असेल, हे दाखवण्यासाठी त्यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. (harsh goenka shared video on twitter to show the happiness of getting second corona dose)
हर्ष गोयंका यांनी शेअर केलेला व्हिडीओ पाहून प्रत्येकाला नक्कीच हसू फुटेल. यामध्ये व्हिडीओमध्ये एक महिला पूर्ण तन्मयेने अगदीच हर्षोल्हासात गात आहे. वाद्यासोबत सूर मिसळताना ही गायीका सुरुवातीला छोट्या आवाजात गातेय. मात्र, आवाज वाढवत तबल्याच्या तालावर पहाडी आवाजात ‘पिया तेरा…’ हे गाणं गाते. तबल्याने ठेका घेतल्यानंतर महिलासुद्धा आपला आवाज मोठा करते. गीत गाणाऱ्या महिलेसोबत आणखी एक महिला आहे. ही दुसरी महिला कोरस म्हणून पहिल्या महिलेला साथ देते आहे. यावेळी गाणं सुरु असताना मध्येच या दोन्ही महिला जोरात टाळ्या वाजवत आपली मान डोलवत आहेत.
After taking the second vaccine jab… pic.twitter.com/4TriaMVi9G
— Harsh Goenka (@hvgoenka) March 19, 2021
व्हिडीओमधील तबल्याची साथ, हाताच्या टाळ्या, महिलेचा पहाडी आवाज आणि दोन्ही महिलांचं डोलणं हे सगळं दृश्य अगदीच मजेदार आहे. एखादी गोष्ट मनासारखी झाल्यावर माणूस जसे हुरळून जातो, आनंदीत होतो, आपल्याला कशाचेही भान राहत नाही. अगदी तसंच काहीसं या व्हिडीओतून प्रतित होतं. त्याचबरोबर हा व्डिडीओ पाहून महिलांच्या मान डोलवण्यामुळे आपल्याला लगेच हसू फुटतं.
This is relatable too?? pic.twitter.com/1Odbxclrcc
— Zaeem khan (@zaeemkhan4u) March 19, 2021
याच कारणामुळे सध्याच्या कोरोना लसीकरणाच्या मोहिमेला घेऊन हर्ष गोयंका यांनी हा मजेदार व्हिडीओ त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. कोरोना लस घेतली तर कोरोनापासून संरक्षण होऊ शकतं असा प्रत्येकाचा समज आहे. त्यामुळे एकदा का लसीचे दोन्ही डोस भेटले तर कोरोना होऊ शकणार नाही, असं प्रत्येकाला वाटतं. हाच धागा पकडत कोरोनाचा दुसरा डोस भेटल्यामुळे नागरिकांची कशी स्थिती असते हे दाखवण्यासाठी त्यांनी वरील फोटो शेअर केला आहे.
गोयंका यांनी हा व्हिडीओ शेअर करताच सोशल मीडियावर अनेक अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेकांनी हसऱ्या ईमोजू पाठून गोयंका यांच्या कॅप्शनला उत्तर म्हणून मजेदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.
इतर बातम्या :
Video | तंंदूर रोटी बनवताना घाणेरडेपणा, हॉटेलमधील कामगाराचा संतापजनक व्हिडीओ
VIDEO | पांढरी गाडी, काळं जॅकेट; चालत्या गाडीवर ‘हवा’ करणाऱ्या पठ्ठ्याला पोलिसांनी शिकवला धडा