Harsh Goenka यांनी केलेलं ट्विट पाहिलंत का? आपलं ‘केसरिया’ तिकडे फेमस! कमाल व्हिडीओ

| Updated on: Nov 01, 2022 | 3:03 PM

गायकाचा सुमधुर आवाज ऐकून लोक कसे तिथेच थांबून गाण्याचा आनंद लुटतायत ते या व्हिडीओमध्ये पाहायला मिळतं. व्हिडीओ शेअर केलाय हर्ष गोएंका यांनी.

Harsh Goenka यांनी केलेलं ट्विट पाहिलंत का? आपलं केसरिया तिकडे फेमस! कमाल व्हिडीओ
kesariya
Image Credit source: Social Media
Follow us on

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर स्टारर ‘ब्रह्मास्त्र’चे ‘केसरिया’ हे गाणे या वर्षातील टॉप रोमँटिक गाण्यांपैकी एक बनले आहे. जगभरात सुद्धा या गाण्याने लोकांना अक्षरशः वेड लावलंय. नुकताच लंडनच्या रस्त्यांवरून एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये अरिजीत सिंगने गायलेल्या या गाण्यातून एक स्ट्रीट संगीतकार लोकांचे मनोरंजन करताना दिसत आहे. गायकाचा सुमधुर आवाज ऐकून लोक कसे तिथेच थांबून गाण्याचा आनंद लुटतायत ते या व्हिडीओमध्ये पाहायला मिळतं. व्हिडीओ शेअर केलाय हर्ष गोएंका यांनी.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, लंडनच्या रस्त्यावर एक गायक गाणे गाताना दिसत आहे. या क्लिपमध्ये असे पाहायला मिळते की, गायकाने कोरस गायला सुरुवात करताच त्याचा सुरेल आवाज ऐकण्यासाठी लोक जमा होतात.

परदेशी लोकही गाण्यावर थिरकताना दिसतात. लोक गायकाचे व्हिडिओ बनवू लागतात. गंमत म्हणजे ती पाहून लोकांची मोठी गर्दी तिथे जमते. आपण याला बॉलिवूड गाण्यांची जादू देखील म्हणू शकता की परदेशी लोकांनाही आपल्या गाण्यांच्या तालावर नाचण्यास भाग पाडले जाते.

आरपीजी ग्रुपचे चेअरमन हर्ष गोयंका यांनी हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ 1 लाखापेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे, तर 3 हजाराहून अधिक लोकांनी लाईक केला आहे.

लोकांना हा व्हिडिओ इतका आवडतोय की तेही तो भन्नाट व्हिडीओ शेअर करत आहेत. याशिवाय अनेकांनी आपल्या प्रतिक्रियाही नोंदवल्या आहेत.

एका युझरने कमेंट केली की, “मुंबईपासून हजारो किमी अंतरावर असलेल्या रस्त्यावर लोकांना थिरकण्यासाठी क्यूट साँग.”

त्याचवेळी आणखी एक युझर म्हणतो, आमच्या गाण्याची जादू. याच कारणामुळे बॉलिवूडने जगभरात आपली मुळे रुजवली आहेत.

आणखी एका युझरने कमेंट केली की, “मी या गायकाला लीसेस्टरमध्ये लाइव्ह ऐकले आहे. तो खरंच खूप अप्रतिम गातो. एकूणच हा व्हिडिओ लोकांना खूप आवडला आहे