RPG एंटरप्रायझेसचे चेअरमन आणि उद्योगपती हर्ष गोएंका यांनी आपल्या ट्विटर हँडलवर एक मनोरंजक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्याला हजारो लोकांनी लाईक केले आहे. त्या व्हिडीओमध्ये एका ऑटो रिक्षात बदल करून त्याला लक्झरी कारचं रूप देण्यात आलं आहे. जुगाड करून या रिक्षाचे कारमध्ये रूपांतर करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. जी एखाद्या लक्झरी कारपेक्षा कमी दिसत नाही आणि युजर्सला सुद्धा ही कार या व्हिडिओत आवडली आहे. या व्हिडीओवर विविध प्रकारच्या प्रतिक्रियाही मिळत आहेत.
हर्ष गोएंका अनेकदा आपल्या ट्विटर हँडलवर काही ना काही मजेशीर व्हिडिओ अपलोड करत असतात, पण यावेळी त्यांनी एका रिक्षाचा व्हिडिओ अपलोड केला आहे. 58 सेकंदाचा हा व्हिडिओ आहे. ज्यात अतिशय सुंदर पद्धतीने एका रिक्षाला मॉडिफाई करून लक्झरी कारचे स्वरूप देण्यात आलेलं आहे. याच्या मागील बाजूस अतिरिक्त सीटही लावण्यात आल्या असून ऑटो वरच्या बाजूने पूर्णपणे उघडी आहे. ही रिक्षा पाहण्यासाठी आजूबाजूला लोकांचीही मोठी गर्दी होतीये. जो कोणी रिक्षा बघतो तो तिथे 2 मिनिटे थांबतो. हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर सर्वजण त्याला इंटरेस्टिंग म्हणत आहेत.
या व्हिडिओला आतापर्यंत 18000 हून अधिक व्ह्यूज मिळाले असून 400 हून अधिक लोकांनी त्याला लाइक देखील केले आहे. एका युजरने लिहिले की, या भावाने चमत्कार केला आहे, त्याने ऑटोला काय बनवलं आहे. आणखी एकाने लिहिलं आहे की, हे एकदम शाही दिसतंय. त्याचप्रमाणे अनेकांनी ऑटोचे कौतुक केले आहे. जो कोणी हा व्हिडिओ बघतो, तो नक्कीच पुन्हा पुन्हा हा व्हिडिओ बघतोय.
If Vijay Mallya had to design a low cost 3 wheeler taxi @NaikAvishkar pic.twitter.com/q3pTGEV6xL
— Harsh Goenka (@hvgoenka) February 4, 2023
यापूर्वी अनेक मनोरंजक व्हिडिओ अपलोड करणारे हर्ष गोएंका आपल्या ट्विटर हँडलवर अनेकदा काही मनोरंजक व्हिडिओ टाकत असतात. त्यांच्या या व्हिडिओला चाहते खूप लाईक आणि कमेंट करतायत. सध्या हा व्हिडिओ त्याच्या ट्विटर हँडलवर चर्चेत आहे.