पाळीव कुत्रे आपल्या घरासमोर किंवा घराच्या आजूबाजूला दिसले असतील. कुत्र्यांच्या अनेक कृती तुम्हाला चांगल्या वाटतात पण काही बऱ्याच वाईट असतात. कुत्रं कधी खूप ओरडत असताना ऐकलंय का? मोठमोठ्याने भुंकत असताना कुत्रे रडतायत असं म्हटलं जातं. पण खरं तर तुम्हाला वाटतं तसं नाही. कुत्रे मोठमोठ्याने का आणि केव्हा भुंकतात? याबद्दल एक अतिशय रंजक खुलासा करण्यात आला आहे. खरं तर अनेकदा रात्री कुत्रे ओरडताना असतात. यावेळी ते भुंकत नसून रडत असल्याचे म्हटलं जातं. जुन्या समजुती लक्षात घेऊन लोक तेव्हा म्हणायचे की जेव्हा कोणी देवाघरी जाणार असेल तेव्हा असं होतं. असंही म्हटलं जातं की त्यांच्या आजूबाजूला एक आत्मा आहे जो सामान्य लोकांना दिसत नाही, ते पाहून कुत्रे रडू लागतात.
जेव्हा कुत्रे असे करतात, तेव्हा लोक बरेचदा त्यांना हाकलून देण्यास सुरवात करतात. कुत्रा भुंकण्यामागचे एक कारण म्हणजे ते रात्री अप्रिय घटनेचे संकेत देतात. कुत्रे रात्री रडतात किंवा दिवसा दोन्ही वेळा रडतात, त्यांचे रडणे शुभ नसते. याशिवाय घरातील पाळीव कुत्रा रडू लागला किंवा त्याच्या डोळ्यातून अश्रू येत असतील किंवा त्याने खाणे-पिणे बंद केले तर याचा अर्थ घरात संकट येणार आहे, असेही मानले जाते.
खरं तर कुत्रे तेव्हाच रडतात जेव्हा त्यांना त्यांच्या उर्वरित साथीदारांपर्यंत संदेश पोहोचवायचा असतो. या खास आवाजाच्या माध्यमातून तो कधी कधी आपल्या बाकीच्या सहकाऱ्यांना आपलं लोकेशन सांगतो जेणेकरून ते त्यांच्यापर्यंत सहज पोहोचू शकतील. त्याचबरोबर कुत्रे वेदना होत असतानाही ओरडतात किंवा रडतात. आपली समस्या व्यक्त करण्याचा त्यांचा हा एक खास मार्ग आहे.
एका मीडिया रिपोर्टनुसार, कुत्रा हा एक असा प्राणी आहे ज्याला माणसांमध्ये मिसळायला आवडतं. एकटेपणा त्यांना अजिबात आवडत नाही. जेव्हा जेव्हा ते घरात किंवा घराबाहेर रस्त्यावर एकटे असतात तेव्हा त्यांना एकटेपणा जाणवतो. त्यामुळं ते असं करतात. कुत्र्याला इजा झाली किंवा त्याची तब्येत ठीक नसेल तरी तो रात्री रडायला लागतो.