कौन बनेगा करोडपती मध्ये अमिताभ बच्चन यांनी एक खूप सुंदर गोष्ट सांगितलीये. गोष्टीचं नाव, “बडा कौन…?” ही गोष्ट सगळ्यांनी ऐकली पाहिजे. सध्या या गोष्टीची त्यातून मिळणाऱ्या शिकवणीची सगळ्यांनाच गरज आहे. हा व्हिडीओ शेअर केलाय आयएएस ऑफिसर अवनीश शरण यांनी. “मोठं कोण?” या शर्यतीत आपण काही महत्त्वाच्या गोष्टी खरंच विसरून जातो. माणूस मोठा कसा होतो? कोणत्या माणसाला मोठं म्हणायला हवं ही शिकवण ही गोष्ट देते. एकदा तरी हा व्हिडीओ नक्की बघा. आयुष्याबद्दलची ही शिकवण फार महत्त्वाची आहे.
हा व्हिडीओ शेअर केल्यापासून या व्हिडिओला 8 लाखांहून अधिक व्ह्यूज आणि 27,000 हून अधिक लाईक्स मिळाले आहेत. 5,700 हून अधिक युजर्सनी ही पोस्ट शेअर केली आहे. तसेच या व्हिडिओवर मोठ्या प्रमाणात कमेंट्सही आल्या आहेत.
IAS अधिकारी अवनीश शरण यांनी शुक्रवारी हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केलाय. त्याला, “मोठं कोण…” असं छोटंसं कॅप्शन दिलंय.
बड़ा कौन… pic.twitter.com/oSBJAHZ2Gi
— Awanish Sharan (@AwanishSharan) September 30, 2022
या व्हिडीओमध्ये अमिताभ बच्चन म्हणतात, “अलीकडेच मी एक अतिशय मनोरंजक कथा ऐकली आहे जी मला तुम्हालाही सांगायचीये, एकदा शाळेच्या पहिल्या दिवशी 9 नंबरने 8 नंबरला थोबाडीत मारली. 8 नंबरने त्याला विचारले की त्याने का मारले? 9 म्हणाला की मी मोठा आहे मी मारू शकतो. हे ऐकल्यावर संपूर्ण वर्ग एकमेकांना थोबाडीत मारू लागला.”
हे पाहून शून्य हा आकडा एका कोपऱ्यात जाऊन बसला. नंबर १ शून्याला म्हणाला घाबरू नकोस, “मी तुला मारणार नाही,” १ नंबर शून्याच्या शेजारी बसला. ज्या नंतर 0 चे रूपांतर 10 मध्ये झाले. शून्याने विचारले, “बाकी सगळेजण आपल्यापेक्षा लहानांना मारत असताना तू मला मोठं का केलंस?”
यावर १ नंबर फार छान उत्तर देतो खरं तर याच उत्तरामुळे हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झालाय. या उत्तरातून सगळ्यांनाच शिकवण मिळते.