नवी दिल्ली : आपण एखाद्याला म्हणतो की याच्या जिभेला काही हाडच नाही किंवा याच्या जिभेला काही लगामच नाही. परंतू अमेरिकेच्या कॅलिफोर्नियात राहणाऱ्या एका माणसाची जिभ ( LongTongue ) इतकी लांब आहे की तुम्ही खरोखरच त्याच्या जिभेला लगाम लावू शकत नाही. बर नुसत्या लांब जिभेचाच रेकॉर्ड त्याच्या नावावर नाही तर या लांब जिभेचा वापर करून तो पेंटींग देखील करीत आहे. त्याने एका टीव्ही शो दरम्यान आपल्या जिभेने चित्रे काढण्याचा पराक्रमही केला आहे.
या अजब माणसाचे नाव निक स्टोबर्ल असे आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्नियात राहणारा हा माणूस खूपच विरला आहे. मिडीया रिपोर्टनूसार या निकची जिभ चक्क 3.97 इंच लांब आहे, जगातील सर्वात लांब जिभ असल्याचा रेकॉर्ड त्याच्या नावावर आहे. निक अमेरिकन सरकारमध्ये सरकारी नोकरी देखील करतो. त्याने एका टीव्ही शो दरम्यान आपल्या जिभेने चित्रे काढण्याचा पराक्रमही केला आहे.
लांब जिभेचे खूप काही फायदे
मेट्रो डॉट कॉमच्या रिपोर्टनूसार निक याने आपल्या जिभेचा वापर करून कॅनव्हासवर टीव्ही शोचे यजमान फिलिप शॉफिल्ड आणि हॉली विलोबी यांचे चित्र ही काढून सर्वांची वाहवा मिळविली. निकला अधिकृत रित्या जगातीस सर्वात लांब जिभेचा माणूस म्हणून गिनिज वर्ल्ड रेकॉर्डने गौरविले आहे. या लांब जिभेचे काही फायदे असल्याचे तो सांगतो. लोक माझ्या नेहमी बोलायचा प्रयत्न करीत असतात. मला ओळखतात. दुसऱ्याला माझी ओळख सांगतात, त्यामुळे मला स्टार झाल्याचे वाटते असे निक प्रांजळपणे सांगतो.
जगभर होत आहे व्हायरल
मला लांब जिभेसाठी मला जगभरात ओळखले जाते. त्यासाठी गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले नाव नोंदल्याचे ते सांगतात. जेव्हा जेवायचे असेल तर नॅपकीनची आवश्यकता लागत नाही असे निक गंमतीने म्हणतो. जेवणाचे ताट आपण झटपट चाटून पुसून स्वच्छ करू शकतो असे त्याने सांगत स्व:तावरच विनोद केला आहे.
तामिळनाडूतील विरुथुनगर जिल्ह्यातील थिरुथंगल येथील रहिवासी असलेले के. प्रवीण याची जीभ भारतात सर्वात लांब आहे. प्रवीण हा बी.ई. रोबोटिक्स (B.E. Robotics) शाखेचा विद्यार्थी आहे. प्रवीणने जिभेसाठी इंडियन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये स्थान मिळवले आहे. विशेष म्हणजे गिनीस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान मिळावे यासाठी प्रविण खास प्रशिक्षण घेत आहे.