स्टंटशी संबंधित एक व्हिडिओ दररोज सोशल मीडियावर व्हायरल होत असतो. त्यातील काही इतके आश्चर्यचकित करणारे आहेत की, लोकांच्या नजरा व्हिडिओवरून हटत नाहीत. सध्या बाइक स्टंटचा असाच एक व्हिडिओ लोकांचे लक्ष वेधून घेत आहे, जो पाहून लोक म्हणत आहेत – ‘काय धोकादायक स्टंट केला भाऊ?’.
आजच्या तरुणाईमध्ये स्टंटची क्रेझ खूप वाढली आहे. काही जण अशा प्रकारे स्टंट करतात की बघणाऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसतो. सध्या एक स्टंट व्हिडिओ समोर आला आहे जो पाहून लोक थक्क झाले आहेत. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एका मुलाने बाईकसह असा आश्चर्यकारक पराक्रम दाखवला आहे की विचारूच नका. व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक या मुलाच्या टॅलेंटचे भरभरून कौतुक करत आहेत. मात्र, सुरक्षेच्या साधनांशिवाय असा कोणताही स्टंट करू नये, असे आमचे आवाहन आहे. कारण, हे प्राणघातकही ठरू शकतं.
इन्स्टाग्रामवर manjit_roy71_official नावाच्या अकाऊंटवर या मुलाचा अप्रतिम बाइक स्टंट व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत जवळपास 4 लाख लोकांनी याला लाइक केले आहे, तर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. स्टंटचा हा व्हिडिओ किती दमदार आहे, याचा अंदाज यावरून लावला जाऊ शकतो.
एका युजरने लिहिले की, ‘सेफ्टी गिअरशिवाय असे धोकादायक स्टंट करणे योग्य नाही. पण टॅलेंटला एक लाईक आहे.एकाने लिहिलं, “खतरनाक भाई!” आणखी एक युजर म्हणतो, धूम 5 मध्ये एन्ट्री करा. एकूणच या मुलाने आपल्या स्टंटने लोकांना आश्चर्यचकित केले आहे.