एक काळ होता जेव्हा लोकांना सोशल मीडियाची माहितीही नव्हती, पण आजच्या काळात हे सोशल मीडिया लोकांचे ‘जीवन’ बनले आहे. त्याशिवाय लोकांचे जगणे कठीण झाले आहे. हातात मोबाईल असेल तर त्यात कुठलातरी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असणारच. आजकाल इंस्टाग्रामची चलती आहे जिथं विविध प्रकारचे रील आणि व्हिडिओ वारंवार व्हायरल होतात.
कधी मजेदार व्हिडिओ तर कधी गाणे आणि नृत्याशी संबंधित व्हिडिओ. आजकाल असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर तुम्ही हसतच राहाल.
आजकाल भोजपुरी गाणं ‘पतली कमरिया मोरी’ इंस्टाग्रामवर खूप व्हायरल होत आहे. यावर लोक जोरदार रील तयार करतायत.
सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ या गाण्यावर आधारित आहे. खरंतर, या व्हिडिओमध्ये एक मुलगी ‘पतली कमरिया मोरी’ गाण्यावर डान्स करताना दिसत आहे, पण खास गोष्ट म्हणजे ती खूपच लठ्ठ आहे.
तिची कंबर कुठूनही पतली नाही, पण असे असतानाही ती या गाण्यावर ज्या पद्धतीने डान्स करतेय, तिचा आत्मविश्वास पाहण्यासारखा आहे. हे बघून लोकांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केलीये.
मुलीचा हा मजेशीर डान्स व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर mus_ra1 नावाच्या आयडीवरून शेअर करण्यात आला आहे, जो आतापर्यंत 17 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर 4 लाखांहून अधिक लोकांनी व्हिडिओला लाईक देखील केले आहे.
सोबतच लोकांनी व्हिडिओ पाहिल्यानंतर विविध मजेशीर कमेंट्सही केल्या आहेत. एका यूजरने ‘ये तो पत्ली कमर का उल्टा है’ असे गमतीने लिहिले आहे, तर दुसऱ्या यूजरने लिहिले आहे की, ‘एवढी पातळ कमर मी याआधी कधी पाहिली नाही’ असं लिहिलंय.
पण काहीही असलं तरी या मुलीचा आत्मविश्वास हा बघण्यासारखा आहे.