टाळ्यांचा कडकडाट, प्रचंड कौतुक, तरुणाईला टक्कर देणारे काका!

| Updated on: Apr 02, 2023 | 4:42 PM

पार्टीत जेव्हा मोठ्या आवाजात म्युझिक वाजते तेव्हा एक मध्यमवयीन माणूस स्वतःला रोखू शकत नाही आणि तो जबरदस्त नाचू लागतो. हे पाहून तिथे उपस्थित सर्वजण आश्चर्यचकित होतात, मग त्या व्यक्तीचा डान्स पाहून लोक टाळ्यांच्या कडकडाटात जोरदार जल्लोष करतात.

टाळ्यांचा कडकडाट, प्रचंड कौतुक, तरुणाईला टक्कर देणारे काका!
Uncle dancing
Image Credit source: Social Media
Follow us on

म्हणतात वय हा फक्त एक आकडा आहे. जगण्याची एक्सपायरी डेट नसते. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यामध्ये एक मध्यमवयीन व्यक्ती स्टाईलमध्ये डान्स करताना दिसत आहे. यावेळी त्या व्यक्तीचा उत्साह इतका जास्त होता की त्याची स्टाईल पाहताच लोक स्वत:ला सुद्धा थांबवू शकले नाहीत. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही या व्यक्तीचे प्रचंड फॅन व्हाल.

असे म्हणतात की जेव्हा एखादी व्यक्ती खूप आनंदी असते तेव्हा ती आनंदाने उड्या मारते. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला असंच काहीसं पाहायला मिळणार आहे. या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, पार्टीत जेव्हा मोठ्या आवाजात म्युझिक वाजते तेव्हा एक मध्यमवयीन माणूस स्वतःला रोखू शकत नाही आणि तो जबरदस्त नाचू लागतो. हे पाहून तिथे उपस्थित सर्वजण आश्चर्यचकित होतात, मग त्या व्यक्तीचा डान्स पाहून लोक टाळ्यांच्या कडकडाटात जोरदार जल्लोष करतात. हा माणूस आपल्या अप्रतिम नृत्याने डायरेक्ट तरुणाईशीही स्पर्धा करत आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

गुड न्यूज मूव्हमेंटने आपल्या इन्स्टा अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात असंही लिहिलं आहे, वय हा फक्त एक आकडा आहे. नृत्याचा आनंद घ्या. एक दिवसापूर्वी अपलोड केलेला हा व्हिडिओ इंटरनेटवर चांगलाच व्हायरल झालाय. आतापर्यंत जवळपास 1 लाख लोकांनी याला लाइक केलं आहे, तर 12 लाखांहून अधिक व्ह्यूज आहेत. याशिवाय अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

एका युजरने कमेंट करताना लिहिलंय, ‘भाई साहब… काय भन्नाट स्टेप्स आहेत. खरंच अप्रतिम नृत्य.” तर आणखी एका युजरने लिहिले की, ‘या व्यक्तीने मला मायकल जॅक्सनची आठवण करून दिली.” आणखी एका युजरने लिहिले की, “असे वाटते की तो अनेक वर्षांपासून या दिवसाची वाट पाहत होता. एकंदरीतच या माणसाचा डान्स लोकांना खूप आवडत आहे आणि तो एन्जॉय करत आहेत.