नवी दिल्ली : सध्या देशात सर्वात जास्त चर्चा कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या (CM Siddaramaiah) यांच्या नावाची. काँग्रेसने राज्यात एक हाती सत्ता मिळवली आहे. त्यात डीके शिवकुमार यांच्यासह सिद्धरामय्या यांचा मोठा वाटा आहे. काँग्रेसने कर्नाटकात (Karnataka Congress) एकहाती 135 जागा मिळविल्या आहेत. भाजपला आसमान दाखविल्याने ते हिरो ठरले आहे. सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्र्यांची शर्यत जिंकली, त्यांच्याच डान्स स्टेपने पण अनेकांना भूरळ घातली आहे. त्यांचा एक जुना व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत आहे. त्यांचा हा डान्सचा व्हिडिओ (Siddaramaiah Dance Video) जुना असला तरी तो सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. त्यावर अनेक मिश्किल कॉमेंट्स पण पडल्या आहेत.
इतक्या संपत्तीचे आहे धनी
सिद्धरामय्या यांच्याकडे एकूण 51 कोटींची मालमत्ता आहे. निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या शपथपत्रात त्यांनी याविषयीची माहिती दिली आहे. त्यांची पत्नी पार्वती यांच्या नावावर 21 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आहे. तर 9 कोटी रुपये सिद्धरामय्या यांच्या नावे तर पत्नीच्या नावे 11 कोटी रुपये आहेत. दोघांच्या नावे 30 कोटी रुपयांची अचल संपत्ती आहे. सिद्धरामय्या यांच्या नावे 9 कोटींची अचल संपत्ती तर पत्नी पार्वतीच्या नावे 20 कोटी रुपयांची अचल संपत्ती आहे. सिद्धरामय्या यांच्या डोई जवळपास 23 कोटी रुपयांचे कर्ज आहे.
ताल-लय एकदम जोरात
खरंतर राजकीय पुढाऱ्यांची पाऊलं थिरकत असली तरी त्यांना नृत्य फारसं येत नसल्याचे आपण अनेकदा बघितलं आहे. पण भाजपला धूळ चारणाऱ्या सिद्धरामय्या यांची नृत्यातील पदतालित्य, मुद्रा पाहून तुम्हाला हा डान्स पाहण्याचा मोह आवरणार नाही. या व्हिडिओत सिद्धरामय्या त्यांचे समर्थक, कार्यकर्ते यांच्यासह बहारदार डान्स करताना दिसत आहेत.
लोकनृत्याचा उत्सव
हे लोकनृत्य एकदम बहरले आहे. त्यात सिद्धरामय्या यांच्या स्टेप तर एकदम परफेक्ट पडल्या आहेत. त्यांचे समर्थकही जोरदार नृत्य करत आहेत. त्यांनी या नृत्यासाठी खूप मेहनत घेतल्याचे दिसून येते. त्यांनी त्यासाठी नृत्य शिकल्याचे दिसून येते. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा कर्नाटकात जास्त चर्चिल्या गेली. त्यावेळी सिद्धरामय्या यांनी समर्थकांसह हा डान्स केला होता. त्यावेळी हे नृत्य गाजले होते. आता सिद्धरामय्या हे मुख्यमंत्री झाल्यानंतर व्हिडिओ पुन्हा व्हायरल झाला.
20 लाखांहून जास्त व्ह्युज
सिद्धरामय्या यांचा हा डान्स सोशल मीडियावर तुफान लोकप्रिय झाला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर
bengaluru.memes नावाच्या आयडीवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 2 दशलक्ष म्हणजे 20 लाखांहून अधिक वेळा पाहण्यात आले आहे. त्यावर प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे.
चुकून राजकारणात आला की काय
सिद्धरामय्या यांचा डान्स पाहून युझर्संनी त्यांना चुकून राजकारणात आला की काय असा सवाल केला आहे. काहींनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. त्यांचे पदतालित्य अनेकांना आवडले आहे. काहींना त्यांच्या डान्सने भूरळ घातली आहे.