Lottery: एका रात्रीत मालामाल! बनला जगातला 25वा श्रीमंत व्यक्ती…

| Updated on: Sep 06, 2022 | 1:19 PM

बरेचदा आपली स्वप्नं सुद्धा सीमित असतात. सगळ्यांचीच नसली तरी अशा लोकांची टक्केवारी जास्त आहे ज्यांची स्वप्नं वास्तविकतेला धरून असतात. असंच एका व्यक्तीसोबत घडलं.

Lottery: एका रात्रीत मालामाल! बनला जगातला 25वा श्रीमंत व्यक्ती...
Lottery
Image Credit source: Social Media
Follow us on

समजा अचानक तुमच्या बँकेच्या अकाऊंट (Bank Account) मध्ये खूप खूप पैसे आले आणि जगातल्या श्रीमंत लोकांच्या (World’s Richest People) यादीत गेलात तर? एका रात्रीत असं होऊ शकतं का? नाही म्हणजे माणूस सगळ्या गोष्टींची स्वप्नं बघू शकतो पण तो पैशाचं स्वप्न बघू शकतो का? तेही इतक्या पैशांचं की ज्यामुळे तो जगातला श्रीमंत व्यक्ती बनेल? नाही. बरेचदा आपली स्वप्नं सुद्धा सीमित असतात. सगळ्यांचीच नसली तरी अशा लोकांची टक्केवारी जास्त आहे ज्यांची स्वप्नं वास्तविकतेला धरून असतात. असंच एका व्यक्तीसोबत घडलं. स्वप्नातही (Dreams) पाहिलं नसेल असं काहीसं त्याच्या आयुष्यात घडलं. एका रात्री त्याला बँकेकडून एक मेसेज येतो. ज्या मेसेज मध्ये खात्यात पैसे जमा झाल्याची माहिती असते. पैसे थोडे थोडके नसतात. ते इतके पैसे असतात की ही व्यक्ती अचानक जगातली श्रीमंत व्यक्तींपैकी एक होते.

खात्यात 3400 अब्ज रुपये जमा

डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, जून 2021 मध्ये अमेरिकेतील लुईझियाना येथे राहणाऱ्या डॅरेन जेम्सला त्याच्या मोबाईलवर एक मेसेज आला. त्या मेसेजमध्ये लिहिलं होतं की, त्यांच्या खात्यात 3400 अब्ज रुपये जमा करण्यात आलेत.

मेसेज वाचल्यानंतर सुरुवातीला त्याला पटलं नाही. तो मेसेज त्याने 2-3 वेळा वाचला. यानंतर त्याने घरच्यांना याबाबत माहिती दिली. हे ऐकून घरचेही अवाक झाले.

इतके पैसे जर अचानक खात्यात आलेत तर या घटनेची चौकशी केली जाऊ शकते. इतक्या पैशांबाबत चौकशी करण्यासाठी अधिकारी आपल्या घरी तपासासाठी येऊ शकतात आणि आपण अडकू शकतो असा डॅरेन जेम्स विचार करू लागला.

या व्यक्तीने बँकेला फोन करून घडलेल्या प्रकाराबाबत माहिती दिली.

3 दिवस खातं फ्रिज!

डॅरेन जेम्स आधी लुईझियाना डिपार्टमेंट ऑफ पब्लिक सेफ्टीमध्ये कायद्याची अंमलबजावणी करणारा अधिकारी होता. आता तो रिअल इस्टेट एजंट म्हणून काम करतो. त्यामुळे त्याला या घटनेचं गांभीर्य माहित होतं. इतके पैसे चुकून येऊ शकतात याची त्याला जाणीव होती.

घरच्यांचा विरोध असतानाही डॅरेन जेम्सने बँकेला याबाबत तक्रार केली. बँकेकडून ३ दिवस खातं फ्रिज करण्यात आलं आणि त्यानंतर काही क्षणांसाठी जगातील श्रीमंत व्यक्तीच्या यादीत राहिलेले डॅरेन जेम्स परत “जैसे थे” परिस्थितीत आले.

तीन दिवस हे अब्जावधी रुपये त्याच्या खात्यात पडून होते. तीन दिवसांनी बँक उघडल्यावर पैसेही उडून गेले होते. हा मेसेज चुकून तुमच्याकडे आला आणि पैसे दुसऱ्याचेच आहेत, असं बँकेनं सांगितलं. जे पैसे होते ते परत करण्यात आले.

इतके पैसे पाहून मात्र डॅरेन जेम्स आणि त्यांचा परिवार काही काळासाठी प्रचंड आनंदात होते.