मुंबई: सोशल मीडियावर दररोज अनेक भावनिक, मजेशीर किंवा चीड आणणारे व्हीडिओ व्हायरल होत असतात. यापैकी काही व्हीडिओ अवघड किंवा तणावाच्या परिस्थितीमध्येही लोकांमध्ये जगण्याची किती उर्मी आणि उत्साह आहे, याचा प्रत्यय आणून देणारे असतात. असाच एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. (Health worker dance in hospital goes viral on Social Media)
हा व्हीडिओ युटा रुग्णालय विश्वविद्यालयातील आहे. यामध्ये रुग्णालयातील एक महिला कर्मचारी अफलातून नृत्य करताना दिसत आहे. या महिलेच्या कौशल्यपूर्ण आणि नजाकतपूर्ण नृत्याची सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून वाहवा होताना दिसत आहे. निळ्या रंगाचा पोशाख परिधान केलेल्या या महिला कर्मचाऱ्याची बॅले डान्सची एक-एक स्टेप पाहण्यासारखी आहे. हे नृत्य सुरु असताना रुग्णालयाच्या लॉबीत एक व्यक्ती पिआनो वाजवत आहे. पियानोच्या सुरावटींवर महिलेचे सुरु असलेले नृत्य सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. सोशल मीडियावर अनेकांनी ही महिला नेमकी कोण आहे, याबद्दल विचारणा केली. मात्र, या महिला कर्मचाऱ्याने तोंडावर मास्क घातल्यामुळे तिची नेमकी ओळख पटू शकलेली नाही.
A moment of pure joy at University of Utah Hospital#uofuhealth #universityofutahhealth pic.twitter.com/kiuBPs6cbA
— University of Utah Health (@UofUHealth) August 31, 2021
सोशल मीडियावर या व्हीडिओवर कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे. या व्हीडिओवरील लोकांच्या मजेशीर कमेंटसही तितक्याच मनोरंजक आहेत. University of Utah Health @UofUHealth या ट्विटर अकाऊंटवरुन हा व्हीडिओ शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत हजारो लोकांनी हा व्हीडिओ पाहिला असून अनेकांनी तो लाईकही केला आहे.
संबंधित बातम्या:
Video: दिलजीत दोसांझच्या गाण्यावर आजोबांचा भन्नाट डान्स, सोशल मीडियावर व्हीडिओ व्हायरल
Video | भर रस्त्यात राग अनावर, म्हाताऱ्या आजोबांचा तुफान राडा, व्हिडीओ व्हायरल
VIDEO: अमेरिकन डान्सर पत्नीसोबत बॉलीवूडच्या ‘छम्मक छल्लो’ गाण्यावर थिरकतो तेव्हा….
(Health worker dance in hospital goes viral on Social Media)