आपण जेव्हा प्रवास करतो तेव्हा प्रवासात अनेक असे लोक असतात ज्यांना आपल्या मदतीची खरंच गरज असते. अनेक लोक अशांना स्वतःहून मदत करतात. असे प्रसंग पाहिल्यावर मग आपल्यालाही जाणवतं की माणुसकी अजूनही जिवंत आहे. मदत करणारे लोक हे जग सुंदर बनवतात. असाच एक व्हिडीओ समोर आलाय ज्यात एक आजोबा ट्रेनमध्ये बसून पेपर वाचतायत. आता तुम्ही म्हणाल यात काय विशेष? या आजोबांना पार्किन्सनचा आजार आहे. या आजारात संपूर्ण शरीर थरथर कापते. साहजिकच पेपर वाचताना या आजोबांना अडचण येत होती. पण ट्रेनमध्ये बसलेल्या या व्यक्तीने या आजोबांना मदत करून माणुसकीचं दर्शन घडवलंय.
पार्किन्सन आजार हा मेंदूशी निगडित आजार आहे. या आजारात मेंदूचा शरीरावर असणारा ताबा सुटतो. मेंदू शरीराला सूचना देऊ शकत नाही. यात संपूर्ण शरीर दीर्घकाळ थरथर कापते. कोणतंही काम करणं अशक्य होतं. अशावेळी इतरांची मदत लागते.
हा व्हिडीओ बघितल्यावर कळून येतं या आजोबांना हाच आजार आहे. त्यांना वर्तमानपत्र वाचताना अडचण येतीये. मग अशावेळी समोर बसलेली एक व्यक्ती त्यांना मदत करते. ती त्यांना ते वर्तमानपत्र पकडायला मदत करताना दिसते.
हा व्हिडीओ भावूक करणारा आहे. व्हिडीओ लंडनमधला आहे. व्हिडीओ शेअर करताना “लंडन: पार्किन्सनचा आजार असलेल्या या माणसाला त्याचे वर्तमानपत्र धरता आले नाही, म्हणून एका अनोळखी व्यक्तीने ते धरायला मदत केली. हात लावला जेणेकरून तो ते वाचू शकेल,” असे कॅप्शनमध्ये म्हटले आहे.
(London): This man with Parkinson’s disease couldn’t hold his newspaper so a stranger held it still for him so he could read it.
(?:rosiemegangill)
pic.twitter.com/hUoxqHHQrr— GoodNewsCorrespondent (@GoodNewsCorres1) January 4, 2023
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ गुडन्यूज करस्पाँडंटने ट्विटरवर शेअर केलाय. हा व्हिडिओ ७३ हजाराहून अधिक लोकांनी पाहिलाय.