मदर्स डे (Mother’s Day 2022) 8 तारखेला झाला. तसं पाहिलंतर आईसाठी प्रत्येक दिवस खास असला पाहिजे. दरवर्षी प्रमाणे अनेकांनी आई सोबत फोट, व्डिडिओ पोस्ट करत आईसाठी यंदाचा मदर्स डे खास केला. या सर्वात सोशल मीडियावर एका आई-मुलाच्या विमानातील व्हिडिओचे सर्वत्र कैतुक होतयं. इंडिगो एअरलाइन्सने त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे, जो अनेकांना आवडला आहे. खूप लोक प्रेरित झाले आहेत आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंदाचे हसू आले आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये एक विशेष गोष्ट पाहायला मिळाली. जे फार कमी लोक करू शकतात. या व्हिडीओमध्ये एक आई-मुलाची जोडी फ्लाइटमध्ये पायलटचा गणवेश घालून उभी आहे. आई आणि मुलगा दोघेही पायलट असून त्यांनी मिळून इंडिगो एअरलाईन्स उडवली.
हा व्हिडिओ पाहून सोशल मीडिवरील नेटीझन्स प्रभावित झाले आहेत. या व्हिडीओमध्ये त्या मुलाने पायलट होण्याची गोष्ट सांगितली आहे. त्याने सांगितले आपल्या आईला विमान उडवताना पाहून तो कसा प्रेरित झाला आणि तब्बल २४ वर्षांनंतर तो आईसोबत विमान उडवणार आहे. पायलट म्हणून आई आणि मुलाचे हे पहिलेच उड्डाण होते. मात्र, मुलाने कॉकपिटमध्ये बसून विमान चालवले, तर आईने पायलटच्या गणवेशात प्रवासी म्हणून प्रवास केला. (Indigo pilots son-mother duo fly plane together)
This is such a heartwarming video. Mother, son fly plane together as pilot and copilot. @IndiGo6E pic.twitter.com/LIwJdJh4lO
— Anuj Dhar (@anujdhar) May 9, 2022
व्हिडीओमध्ये दिसत आहे की, मुलगा जेव्हा विमानात प्रवेश करतो तेव्हा तो आत बसलेल्या प्रवाशांना सांगतो की तो पहिल्यांदाच त्याच्या आईसोबत विमानात पायलट म्हणून उपस्थित होता. हे ऐकून विमानात बसलेल्या प्रवाशांना खूप आनंद झाला आणि सर्वांनी टाळ्या वाजवायला सुरुवात केली. काही लोक भावूक होऊन रडायलाही लागले.
या खास प्रसंगी, मुलगा त्याच्या आईला मिठी मारताना आणि गुलाबांचा सुंदर पुष्पगुच्छ देताना दिसतो. इंडिगो एअरलाइन्सने हा व्हिडीओ शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले, ‘मदर्स डेच्या दिवशी आई-मुलाच्या पायलट जोडीपेक्षा चांगले काय असू शकते? मुलगा फ्लाइट चालवत होता आणि आई प्रवासी म्हणून प्रवास करत होती. याव्हिडिओवर लोक कंमेट्स करून त्यांच्या भावना व्यक्त करत आहेत.