Video | पूर आला अन् होत्याचं नव्हतं झालं, तब्बल 25 गाई वाहून गेल्या, हृदय पिळवटून टाकणारा व्हिडीओ

| Updated on: Oct 05, 2021 | 11:29 PM

जोरदार पाऊस झाल्यामुळे बेलदारी येथे नाल्याला मोठा पूर आला असून यामध्ये तब्बल 25 गाई वाहून गेल्या आहेत. या घटनेने गो पालकांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे.

Video | पूर आला अन् होत्याचं नव्हतं झालं, तब्बल 25 गाई वाहून गेल्या, हृदय पिळवटून टाकणारा व्हिडीओ
YAVATMAL COW
Follow us on

यवतमाळ : जिल्ह्याच्या महागाव तालुक्यात काल (4 ऑक्टोबर) जोरदार पाऊस झाला. या पावसात एक काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. जोरदार पाऊस झाल्यामुळे बेलदारी येथे नाल्याला मोठा पूर आला असून यामध्ये तब्बल 25 गाई वाहून गेल्या आहेत. या घटनेने गो पालकांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. ही घटना एका गावकऱ्याने आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात केली आहे. हे दृश्य हृदय पिळवटून टाकणारे आहे.

नाल्याला पाणी आले अन गाई वाहून गेल्या

मिळालेल्या माहितीनुसार दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर काल यवतमाळ जिल्ह्यातील काही भागाला पावसाने झोडपून काढलं. बेलदारी येथील तलाव पूर्ण भरून गेल्यामुळे पाणी बाहेर वाहत होते. तसेच गावाजवळ असलेल्या नाल्यालासुद्धा पूर आला होता. दरम्यान, संध्याकाळी 5 वाजेच्या दरम्यान बेलदारी येथाील गुराखी आपल्या गाई तसेच इतर जनावरे घेऊन आपल्या गावाकडे जात होता. यावेळी गाई हा नाला ओलांडत असताना पाण्याच्या प्रवाहात त्या वाहून गेल्या. पाण्याचा वेग एवढा होता की गुरे अक्षरशः पाण्याच्या प्रवाहासोबतच वाहत गेले.

गो पालकांचे मोठे नुकसान मोठे नुकसान

ही घटना समजताच गावकऱ्यांनी काही गाई वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र  25 गाई, गोरे तसेच इतर जनावरे नागरिकांच्या डोळ्यासमोर वाहून गेले. या घटनेमुळे गो पालकांचे मोठे नुकसान झाले आहे.

पाहा व्हिडीओ :

इतर बातम्या :

Special Report | लखीमपूर हिंसाचारात 4 शेतकऱ्यांसह 9 मृत्यू, लखीमपूर घटनेचा नवीन व्हिडीओ समोर

संपूर्ण कुटुंब संपवण्याचा कट, थेट घर पेटवून दिलं, बुलडाण्यात जावयाला बेड्या

पोरं असावीत तर अशी, चार भाऊ आपसात भिडले, कोर्टात लढले, कोण म्हणतं आई कुठं काय करते?

(heavy rain in buldhana beldari village cattle swept away in water)