मुंबई : बाईक चालवताना हेल्मेट (helmet) अधिक गरजेचं आहे. मग तुम्हाला ही सुध्दा गोष्ट माहित असेल की, वाहतूक पोलिसांच्या नियमानुसार बाईक चालकाने हेल्मेट घातलं नसेल आणि समजा तो सापडला. तर पैशाच्या रुपात त्याला मोठा दंड भरावा लागतो. बाईक चालवताना दोन्ही व्यक्तींनी हेल्मेट (helmet viral story) घालणं गरजेचं आहे. समजा बाईकचा अपघात झाल्यास दोन्ही व्यक्तींना गंभीर इजा होण्याची शक्यता कमी असते. त्याचबरोबर तुमच्या डोक्याला कसल्याही प्रकारचा मार लागत नाही. सध्या हेल्मेटचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर (trending video) चांगलाचं व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एका मुलाच्या डोक्यात हेल्मेट अडकलं आहे.
सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवरती हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून लोकांना धक्का बसला आहे. त्या मुलाच्या डोक्यात हे हेल्मेट कसं काय फसलं आहे. तो व्हिडीओ २० सेंकदाचा आहे. त्यामध्ये मुलाच्या डोक्यात ते हेल्मेट अडकलं आहे. तिथं असलेली लोकं ते हेल्मेट काढण्याचा प्रयत्न करीत आहे. काही लोकांनी हा व्हिडीओ पाहिल्यापासून हसू कंट्रोल होत नाही. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तु्म्ही सुध्दा विचारात पडणार आहे. तुम्हाला सुध्दा असं वाटणार आहे की, त्या मुलाने हेल्मेट कसं घातलं असेल.
I don’t care how he will come out of this, I just want to know how he went inside this? pic.twitter.com/0oujuDZ3PX
— Godman Chikna (@Madan_Chikna) June 15, 2023
ट्विटरवरती हा व्हिडीओ 15 जूनला शेअर करण्यात आला आहे. त्या व्हिडीओला अधिक लोकांनी पाहिलं आहे, त्याचबरोबर शेअर सुध्दा केलं आहे. व्हिडीओ शेअर करीत असताना, कॅप्शन लिहीलं आहे. ‘आम्हाला हे जाणून घ्यायचं नाही की, तो मुलगा कसा बाहेर येणार, परंतु आम्हाला हे जाणून घ्यायचं आहे की, त्याने हे हेल्मेट कसं घातलं आहे’. आतापर्यंत हा व्हिडीओ 33 हजारपेक्षा अधिक लोकांनी पाहिला आहे. त्याचबरोबर शेकडो लोकांनी त्या व्हिडीओला पाहिलं आहे. व्हिडीओ पाहत असलेल्या लोकांनी विविध प्रकारच्या कमेंट सुध्दा केल्या आहेत. एका व्यक्तीने कमेंटमध्ये लिहीलं आहे की, ‘कमी पैशात झेड प्लस सुरक्षा’.