शिवसेनेतील महत्त्वाचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी समर्थक आमदारांसह सूरत गाठल्याने शिवसेना (Shivsena) पक्षात फूट पडणार का, अशी जोरदार चर्चा सुरू झाली. विधान परिषदेचा निकाल लागल्यापासूनच एकनाथ शिंदे शिवसेना नेत्यांच्या संपर्कात नव्हते. ते नॉटरिचेबल असून सूरतमधील ली मेरिडियन या हॉटेलमध्ये आमदारांसह थांबले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात मोठा राजकीय भूकंप आल्याची चर्चा होत आहे. राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार अल्पमतात येणार की काय, अशी शक्यता वर्तवली जात आहे. या राजकीय घडामोडी घडत असतानाच सोशल मीडियावर मीम्सचा वर्षाव होऊ लागला आहे. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, संजय राऊत, अमित शाह अशा विविध राजकीय व्यक्तींवर भन्नाट मीम्स (Memes) व्हायरल होऊ लागले आहेत.
‘मुन्नाभाई एमबीबीएस’, ‘वेलकम’, ‘हेराफेरी’ यांसारख्या चित्रपटांमधील कॉमेडी सीन्स आणि डायलॉगवरून हे मीम्स व्हायरल केले जात आहेत. एकनाथ शिंदे आणि महाराष्ट्र असे हॅशटॅग वापरून हे मीम्स व्हायरल होत आहेत आणि त्यावर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियासुद्धा येऊ लागल्या आहेत. राज्यात घडणाऱ्या नाट्यमय घडामोडी पाहता नेटकऱ्यांच्याही कल्पनाशक्तीला वेग मिळाला आहे.
#MahaVikasAghadi #eknathshinde
What’s happening in #Maharashtra ?
*BJP won 5 seats in the Council Elections today
*13+9 shiv sena MLAs untraceable alongwith Eknath Shinde
???#Devendra_Fadnavis sir be like: #EknathShinde pic.twitter.com/sK0j54befd
— Rohit Sharma ?? (@iRohit_kaushik) June 21, 2022
Shiv Sena’s Eknath Shinde and 13 other MLAs are ‘unreachable’ they are in Surat Gujarat. ?? #EknathShinde #UddhavThackeray pic.twitter.com/NWt3T8Qnu4
— ɅMɅN DUВΞY (@imAmanDubey) June 21, 2022
#MahaPoliticalCrisis #EknathShinde #UddhavThackeray #Maharashtra
Eknath Shinde went to Surat with group of MLAs,
Uddhav Thackeray & MVA Friends : pic.twitter.com/36ZyvvYcOz
— g0v!ñD $#@®mA (@rishu_1809) June 21, 2022
#BREAKING #MaharashtraLegislativeCouncil #Devendra_Fadnavis
Shiv Sena MLA #EknathShinde has gone missing 17 MLAs some where in Surat. Now #Maharashtra govt is set to fall.
Meanwhile #UddhavThackeray trying to save remaining of his MLAs be like:- pic.twitter.com/6Okow1IbaM
— Nayan Jaiswal (@Nayanjaiswal16) June 21, 2022
#EknathShinde with 12 others to Uddhav Saheb :#DevendraFadnavis #KhelaHobe pic.twitter.com/A213SWiD6l
— चारsauबीस (@charsau20) June 21, 2022
Sanjay Raut claims Eknath Shinde and other MLAs are in touch with Shiv Sena.
In reality Sanjay Raut: #UddhavThackeray #EknathShinde pic.twitter.com/yPeJ3wFjm8
— ɅMɅN DUВΞY (@imAmanDubey) June 21, 2022
#MaharashtraMLCElection2022
Shiv Sena MLAs missing from #Maharashtra…with #EknathShindeMeanwhile Sanjay Raut be like:- pic.twitter.com/3fAJ52cGzW
— Raghav Chaturbedi (@RaghavChaturbe2) June 21, 2022
एकनाथ शिंदेंनी आपल्याच पक्षाविरोधात पुकारलेलं बंड हा शिवसेनेसाठी सर्वांत मोठा धक्का मानलं जात आहे. ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असल्याचं सांगितलं जातंय. राष्ट्रवादीवरील नाराजी आणि निधी मिळण्यात होत असलेला अन्याय यामुळे शिंदे यांनी थेट महाविकास आघाडीलाच आव्हान दिल्याचं म्हटलं जात आहे.
एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यादरम्यान संजय राठोड हे शिवसेना नेते मध्यस्थी करणार आहेत, अशी माहिती समोर येत आहे. उद्धव ठाकरे यांच्या वर्षा निवासस्थानावर झालेल्या बैठकीनंतर संजय राठोड यांना उद्धव ठाकरेंचा निरोप घेऊन सूरतला पाठवलं जात आहे. संजय राठोड आणि एकनाथ शिंदे यांच्यात एक बैठक होईल आणि शिंदे संध्याकाळी आपला अंतिम निर्णय घोषित करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.