सोशल मीडियावर एक व्हिडिओ खूप पाहायला मिळत आहे, जो बिझनेसमन आनंद महिंद्रा यांनीही शेअर केला आहे. ही क्लिप निवडणूक अधिकाऱ्यांची आहे, जे बर्फातून ईव्हीएम मशीन घेऊन जाताना दिसत आहेत. वास्तविक, हिमाचल प्रदेशात शनिवारी झालेल्या विधानसभा निवडणुकांनंतर हिमवृष्टीत चालणाऱ्या पोलिंग एजंट्सची ही क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झालीये. त्यात निवडणूक अधिकारी भरमौर (चंबा जिल्हा) विधानसभा मतदारसंघात 12 हजार फूट उंचीवर असलेल्या चासक बाटोरी मतदान केंद्रावरून परतताना दिसत आहेत. बर्फात ते सुमारे 15 किलोमीटर 6 तास चालले.
शनिवारी हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभेच्या 68 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान झालं, त्यात जवळपास 66 टक्के मतदान झालं.
आनंद महिंद्रा यांनी 13 नोव्हेंबर रोजी ट्विटरवर एक जीआयएफ शेअर करत लिहिले – हिमाचल प्रदेशमध्ये 12 हजार फूट उंचीवर असलेल्या मतदान केंद्रावर पोहोचण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांनी बर्फात 15 किमीचा प्रवास केला.
अशी चित्रे शब्दांपेक्षा आपल्या लोकशाहीची ताकद जास्त बोलतात! महिंद्राच्या या ट्विटला 5 हजारहून अधिक लाईक्स आणि 500 हून अधिक लाईक्स मिळाले आहेत.
तसेच, युजर्स यावर आपले फिडबॅक देत आहेत. काही युझर्सनी या निवडणूक अधिकाऱ्यांना सलाम केला, तर काहींनी त्यांना पदकं मिळायला हवीत, असं लिहिलं.
या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, मतदान अधिकारी जड पिशव्या घेऊन बर्फाने झाकलेल्या टेकड्यांवरून चालत आहेत. बर्फ इतका आहे की त्यांची पावलेही डळमळतायत पण तरीही ते त्यांचं कर्तव्य बजावतायत.
एएनआय या वृत्तसंस्थेने हा व्हिडिओ शेअर केला असून त्याने दिलेल्या वृत्तानुसार, चंबा जिल्ह्यातील पांगी भागातील भरमौर विधानसभा मतदारसंघातील चासक बटोरी मतदान केंद्रावरून निवडणूक अधिकारी परतत आहेत.
#WATCH | Polling parties returning back from Chasak Batori polling station in Bharmaur Assembly Constituency in Pangi area of Chamba district. They walked around 15km in snow for 6 hours#HimachalPradeshElections pic.twitter.com/BvZNvoWAfu
— ANI (@ANI) November 12, 2022
सुमारे 15 किमी बर्फात ते 6 तास चालले. या क्लिपला आतापर्यंत 1 लाखाहून अधिक व्ह्यूज आणि 4,000 हून अधिक लाईक्स मिळाले आहेत.