मुंबई : काही प्राणी हे दिसायला आकर्षक आणि लोभस असतात. तर काही प्राणी हे अतिशय हिंस्र म्हणून ओळखले जातात. वाघ, सिंह कोल्हा त्यापैकीची काही उदाहरणं. मात्र, यामध्येच पाणघोडा हा असा एक प्राणी आहे जो दिसायला शांत दिसतो. मात्र, त्याला एकदा राग आला की परिस्थिती गंभीर होऊन बसते. त्याची प्रचिती एका व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमधून आली आहे. हा पाणघोडा एका बोटीचा थरारकपणे पाठलाग करतो आहे. बोटीमध्ये बसलेल्यांवर हल्ला करण्याचा तो आटोकाट प्रयत्न करतोय. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Hippopotamus chases speed Boat video goes viral on social media)
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडीओ अपलोड केले जातात. यामध्ये अनेक व्हिडीओ हे प्राणी तसेच पक्ष्यांचे असतात. प्राणी आणि पक्ष्याचे व्हिडीओ लोक आवडीने पाहत असल्यामुळे ते काही क्षणात व्हायरलसुद्धा होतात. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ सुधा रामेन यांनी शेअर केला असून तो एका पाणघोड्याचा आहे. हा व्हिडीओ झांबिया येथील असल्याचे सांगितले जात आहे.
या व्हिडीओमध्ये पाणघोडा अतिशय रागात असल्याचे दिसतेय. तो समोर असलेल्या बोटीचा पाठलाग करतोय. मिळालेल्या माहितीनुसार या बोटीतील लोक पाणघोड्याची शुटिंग करण्यासाठी पाण्यात उतरले होते. मात्र, यावेळी पाणघोड्याने त्यांना पाहिले आणि त्याने थेट त्यांचा पाठलाग सुरु केला.
पाहा व्हिडीओ :
This hippo had chased a speeding boat for about 200m in Zambia.
Do you know – Hippos do not swim, they can walk underwater with a great speed of even 15miles/hour. Their fat makes it buoyant enough to float. Always better to be careful around this animal.
? Brandon Reed pic.twitter.com/DR5ANSpVtw— Sudha Ramen IFS ?? (@SudhaRamenIFS) June 1, 2021
आयएफएस ऑफिसर सुधा रामेन यांनी हा व्हिडीओ शेअर करताना मजेदार माहिती दिली आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे पाणघोड्याला पोहता येत नाही. मात्र, तो पाण्यात 15 मैल प्रतितासाच्या वेगाने चालू शकतो.
दरम्यान, बोटीत बसलेले लोक पाणघोड्यापासून स्वत:चे संरक्षण करण्यात यशस्वी ठरले. मात्र, पाणघोड्यापासून नेहमी लांब राहिले पाहिजे असे या व्हिडीओच्या निमित्ताने आवर्जून सांगितले जात आहे. हा व्हिडीओ सध्या प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.
इतर बातम्या :
Video | नवरा-बायकोमध्ये कडाक्याचं भांडण, मध्येच गॅलरी तुटली अन् घडला भीषण अपघात, घटना कॅमेऱ्यात कैद
Video | बिबट्याची थेट पाण्यात उडी, एका सेकंदात मगरीची शिकार, पाहा थरारक व्हिडीओ
Viral Video : भर मंडपात नवरीने डोळे मिचकावले, केला ‘असा’ इशारा की सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
(Hippopotamus chases speed Boat video goes viral on social media)