मेक्सिको : हवेत उडणाऱ्या हॉट एअर बलूनला आग लागल्याने दोन जणांचा मृत्यू झाला आहे. ही आग लागल्यानंतर बलूनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी बलूनमधून उंचावरूनच उडी घेतली. या दुर्घटनेत एक मुलगाही भाजला आहे. ही घटना अमेरिकेजवळच्या मेक्सिकोमध्ये घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पहिल्यांदाच आकाशात गेलेल्या हॉट एअर बलूनला आग लागल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियातून तुफान व्हायरल होत आहे.
मेक्सिकोच्या सरकारनेही या घटनेची पृष्टी केली आहे. हॉट एअर बलूनला आग लागल्यानंतर बलूनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी धडाधड उड्या मारली. या दुर्घटनेत आगीत होरपळल्याने दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर एक मुलगा भाजला आहे. हा बलून मेक्सिको सिटीपासून 70 किलोमीटर लांब उत्तर-पूर्व येथील टियोतिहूआकैन पुरातत्त्व स्थळावर ऊंचावर उडत होता. हॉट एअर बलूनमधून प्रवास करण्यासाठीचं हे अत्यंत महत्त्वाचं ठिकाण आहे. बलूनमधून अवकाशाची सफर करण्यासाठी या ठिकाणी शेकडो लोक येत असतात.
बलूनला लागलेल्या आगीत होरपळून दोन जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात एका 39 वर्षीय महिलेचा आणि एका 50 वर्षीय व्यक्तिचा समावेश आहे. मात्र, त्यांची नावे कळू शकले नाहीत. तर आगीत एक मुलगा भाजला आहे. त्याचा चेहरा खूप भाजला आहे. त्याच्या पायालही फ्रॅक्चर झालं आहे.
या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. त्यात उडत्या बलूनला कशी आग लागलीय हे दिसून येते. आग लागल्यानंतर प्रवाशांची सुरू असलेली आरडाओरडही या व्हिडीओतून ऐकायला मिळत आहे. काही लोक भीतीने बलूनमधून उडी मारतानाही दिसतत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर ही घटना किती भयंकर होती, त्याचा अंदाज येतो.
Mexico ??
! Breaking news!??
Saturday, April 01, 2023, in the morning hours.
a hot air balloon catches fire and collapses in Teotihuacan, 2 people are reportedly dead.
The events occurred this morning in the vicinity of the Pyramid of the Sun and the area was cordoned off. pic.twitter.com/DlzJdv2oHH
— Lenar (@Lerpc75) April 1, 2023
हा व्हिडीओ एका व्यक्तीने ट्विटरव शेअर केला आहे. हा व्हिडीओ 15 हजाराहून अधिक लोकांनी पाहिला आहे. अनेक यूजर्स त्यावर रिअॅक्ट झाले आहेत. एका यूजर्सने तर प्रचंड भयावह दृष्य होतं असं म्हटलंय. तर दुसऱ्याने सर्व्हिस प्रोव्हायडरवर कारवाईची मागणी केली आहे. एका यूजर्सने तर साहसी घटनांमध्ये रिस्क असतेच, असं म्हटलं आहे.