मोराला देशाच्या ‘राष्ट्रीय पक्ष्या’चा दर्जा आहे. त्याच्या शिकारीवर पूर्णपणे बंदी आहे. जर एखादी व्यक्ती त्याची शिकार करताना पकडली गेली तर त्याला तीन ते सात वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे. लांडोरच्या गरोदरपणाबद्दल अनेक लोकांनी विविध प्रकारच्या पौराणिक कथा सांगितल्या आहेत. अनेक सामान्य लोकांचाही यावर विश्वास होता, कारण हे बोलणाऱ्यांमध्ये काही सुप्रसिद्ध व्यक्तिमत्त्वांची नावंही समाविष्ट होती. कुणी म्हटलं की मोराने लांडोरच्या डोळ्यात अश्रू टाकले तर लांडोर गरोदर राहते. मोर-लांडोरच्या नात्याबद्दल कुणी म्हटलं की, लांडोर अंडी देत नाही वगैरे वगैरे…
In 1860, Charles Darwin wrote that “The sight of a feather in a peacock’s tail makes me sick.” How could such a cumbersome, seemingly pointless trait evolve? His eventual answer: The tail isn’t a survival tool; it’s a mating ornament, shaped by the peahen’s mate preferences. pic.twitter.com/8zNLC06KfD
— Steve Stewart-Williams (@SteveStuWill) September 13, 2021
काही लोकांचा असा विश्वास आहे की मोरांचे शारीरिक संबंध नसतात. पण यात किती सत्य आहे. आज आपण ते समजून घेण्याचा प्रयत्न करू.
एकदा उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी असेही म्हटले होते की मोर आयुष्यभर ब्रह्मचारी राहतो आणि त्याच्या अश्रूंमुळे लांडोर गर्भवती राहते.
असा संभ्रम दूर करण्यासाठी काही लोकांनी आता पुरावे सादर केलेत. त्यांना पाहून तुमचा गोंधळ दूर होईल. पक्ष्यांचे लैंगिक संबंध किंवा शारीरिक संबंध हे ‘क्लोकल किस’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या खास चुंबनामुळे होतात.
बहुतेक नर पक्षी मादीच्या वर बसतात आणि नंतर त्यांचे शुक्राणू मादीच्या शरीरात टाकतात. ही क्रिया सुमारे 8 ते 16 सेकंद चालते. मोर आणि लांडोर या ‘क्लोकल किस’ ची पद्धत अवलंबतात.
Peacock depositing its tears into peahen’s eyes. ?
(Pic by Vinod Goel) pic.twitter.com/RDRhYU2tVL— Siddharth Deshpande (@devsdd) May 15, 2019
आता मोराचे लांडोरशी शारीरिक संबंध नाहीत, असे कोणी सांगितल्यावर त्यांचा गैरसमज दूर करून त्यांना सांगा की, बाकी पक्ष्यांप्रमाणे मोर आणि लांडोरही ‘क्लोकल किस’चा आधार घेतात आणि लांडोर मोराच्या शुक्राणूने गरोदर राहते.