या ट्रे मध्ये एकूण किती अंडी आहेत? सांगा

| Updated on: Apr 09, 2023 | 1:48 PM

खरं तर ऑप्टिकल इल्युजनचं हे चित्र काही वेगळंच आहे. आतापर्यंत तुम्हाला चित्रांमध्ये काय लपलंय हे सांगायचं होतं पण आता तुम्हाला या चित्रात एकूण किती अंडी आहेत हे मोजून सांगायचं आहे. ट्रे मध्ये अंडी दिसत आहेत पण ही अंडी मोजणं जरा किचकट आहे.

या ट्रे मध्ये एकूण किती अंडी आहेत? सांगा
how many eggs
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई: दुकानदार अंडी विकण्यासाठी ट्रे मध्ये ठेवतात. सध्या ऑप्टिकल इल्युजनचे एक चित्र समोर आले आहे, ज्यामध्ये अंडी क्रेटमध्ये अंडी दिसत आहेत. या ट्रे मध्ये किती अंडी ठेवली आहेत हे मोजून सांगा. तुम्हाला यात किती अंडे आहेत हे आधी लक्षात येणार नाही. चित्र नीट बघा तुम्हाला नक्की लक्षात येईल. खरं तर ऑप्टिकल इल्युजनचं हे चित्र काही वेगळंच आहे. आतापर्यंत तुम्हाला चित्रांमध्ये काय लपलंय हे सांगायचं होतं पण आता तुम्हाला या चित्रात एकूण किती अंडी आहेत हे मोजून सांगायचं आहे. ट्रे मध्ये अंडी दिसत आहेत पण ही अंडी मोजणं जरा किचकट आहे. अंड्यांची संख्या मोजली तर तुम्हाला प्रतिभावंत म्हटले जाईल.

या फोटोची खास गोष्ट म्हणजे हे अगदी साधं दिसत असलं तरी तितकं साधं नाही. लोकांना याचं उत्तर शोधणं कठीण जातंय. नुकताच हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला, त्यामुळे अनेक युजर्सने त्यावर उत्तर देण्यास सुरुवात केली. काहींनी 16 अंडी ठेवल्याचे सांगितले, तर काहींनी 25 अंडी ठेवल्याचे सांगितले. तर काहींचे उत्तर काही औरच आहे.

अजूनही मोजता आलं नसेल, किचकट वाटत असेल तर उत्तर ऐका. या ट्रे मध्ये एकूण 30 अंडी ठेवली आहेत. खालच्या 16 अंड्यांच्या वर नऊ अंडी, वर चार अंडी आणि वर एक अंडी अशा पद्धतीने ते ठेवलेले आहेत. अशा प्रकारे या ट्रे मध्ये एकूण 30 अंडी ठेवली आहेत. आता तुम्ही काय उत्तर दिले आहे याचा अंदाज घ्या.