मुंबई: जर तुमच्याकडे निरीक्षण कौशल्य चांगले असेल तर अत्यंत अवघड प्रश्नांची उत्तरे सहज सापडू शकतात. आपल्याला डोळ्यासमोरील गोष्टीही नीट दिसत नाहीत. तुम्ही कधी अशी चित्रे पाहिली आहेत का जी आपण सोडवाल असे वाटते परंतु जेव्हा आपण ते सोडविण्याचा प्रयत्न करता तेव्हा अपयशी ठरता? यावेळी चित्रात कोणतीही वस्तू नाही, पण काही आकडे आहेत. या गुंतागुंतीच्या चित्रात किती आकडे दिसतात हे तुम्हाला सांगायचं आहे. हा फोटो इंटरनेटवर चांगलाच व्हायरल होत आहे.
व्हायरल होत असलेला हा फोटो बारकाईने पाहिला तर समजेल. खरं तर या चित्रात 7 अंक लपलेले आहेत. ते सर्व तुम्हाला काही सेकंदात शोधायचे आहेत.
जर तुम्ही सर्व आकडे शोधण्यात यशस्वी झालात तर तुम्ही प्रतिभावंत आहात. या चित्रातील 99 टक्के लोकांना हे सापडलं नाही, असा दावा करण्यात आला आहे.
आता तुमची पाळी आहे आणि त्यात कोणते आकडे दडलेले आहेत ते सांगा. चित्रात वर्तुळात काळ्या-पांढऱ्या तिरक्या रेषा फिरत आहेत, ज्यामुळे तुम्हाला भ्रम होईल. सर्व आकडे सांगणे आपल्याला जितकं वाटतंय तितकं सोपं नाही.
Test your observation skills:
How many numbers can you see? pic.twitter.com/uXktK0hEmv
— Steve Burns (@SJosephBurns) January 17, 2023
सुरवातीला मध्यभागी दिसणारे तीन आकडे तुम्ही सहज सांगू शकता, पण त्यानंतरचे आकडे पाहणे सोपे नाही. मानसशास्त्रात अशा चाचण्या केल्या जातात. ट्विटरवर @SJosephBurns नावाच्या एका अकाऊंटने हा फोटो शेअर केला असून कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “तुमच्या निरीक्षण कौशल्याची चाचणी घ्या.” हे आतापर्यंत 5 लाखांहून अधिक लोकांनी पाहिले आहे आणि लोकांनी योग्य उत्तर देण्याचा खूप प्रयत्न केला आहे.