Rent Liechtenstein country: जगभरात पर्यटन करताना हॉटेलमधील रुम भाड्याने घेतली जाते. कधी काही समारंभ असले तर संपूर्ण हॉटेल भाड्याने घेतले जाते. कार, एसी-फ्रीज भाड्याने मिळतात. परंतु एखादा देश भाड्याने घेतला जातो का? या प्रश्नाचे उत्तर नकारर्थीच तुम्ही देणार असाल. परंतु जगात एक देश असा आहे, जो भाड्याने दिला जात होता. त्या देशाचे एका रात्रीचे भाडे ऐकून तुम्हाला धक्काच बसणार आहे. या देशाची लोकसंख्या 40 हजार आहे. मुंबई- दिल्लीपेक्षाही हा देश लहान आहे. परंतु हा देश समृद्ध आहे.
यूरोपमधील स्विट्झरलँड आणि ऑस्ट्रिलिया दरम्यान एक लहान देश आहे. अगदी दिल्ली-मुंबईपेक्षा हा देश लहान आहे. हा देश 160 किमी क्षेत्रफळाचा आहे. या देशात निसर्ग सौदर्यं भरभरून दिले गेले आहे. डोंगर, दऱ्या, समुद्र आहे. लिकटेनस्टाइन (Liechtenstein) असे या देशाचे नाव आहे. 2010 मध्ये हा देश भाड्यावर देण्याचा निर्णय घेण्यात आला. या देशातील एखादे गावसुद्धा भाड्याने दिले जात होते. परंतु 2011 मध्ये हा निर्णय मागे घेण्यात आला. आता हा देश भाड्याने मिळत नाही. परंतु त्या देशासंदर्भात व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
लिकटेनस्टाइन हा खूप श्रीमंत देश आहे. या ठिकाणची लोकसंख्या 40 हजार आहे. हा देश 70 हजार डॉलर म्हणजे जवळपास 60 लाख रुपयांमध्ये एका रात्रीसाठी भाड्याने मिळत होता. एक मार्केटिंग आणि प्रॉडक्शन कंपनीच्या मदतीने हा देश भाड्याने देण्याचा उपक्रम सुरु करण्यात आला होता.
इंस्टाग्राम अकाउंट @geoallday वर लिकटेनस्टाइन देशाबाबत माहिती देणारा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी केलेला या व्हिडिओत या देशासंदर्भात आणि भाड्याने देण्यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यावर युजरने प्रतिक्रिया दिल्या आहेत. 2011 मध्ये देश भाड्याने देण्याचा निर्णय मागे घेण्यात आल्याचे युजरने म्हटले आहे. व्हिडिओमध्ये म्हटले की, जेव्हा कोणी बुकींग करत होते, तेव्हा करारावर सह्या केल्या जात होता. लोकांना किल्लात जाण्यासाठी प्रवेश मिळत होता. राजा स्वत: त्या किल्लाची चावी देत होता.