सध्या सोशल मीडियावर एका महिला डॉक्टरची पोस्ट प्रचंड व्हायरल होत आहे. खरं तर डॉक्टरांनी ट्विटरवर लोकांना भारताच्या लोकप्रिय स्नॅक समोसाबद्दल एक प्रश्न विचारला आहे, ज्यावर लोकदेखील मजेशीर पद्धतीने प्रतिक्रिया देत आहेत. मात्र अनेक युजर्सनी याला निरुपयोगी प्रश्न म्हणून संबोधले आहे आणि लिहिले आहे की, ‘मॅडम, तुमचे पाय कुठे आहेत? अशा प्रश्नासाठी तुम्हाला 21 तोफांची सलामी मिळायला हवी.’
समोसा हा इतका लोकप्रिय स्नॅक आहे की घरात पाहुणा आला किंवा भूक भागवण्यासाठी समोसे हा उत्तम पर्याय मानला जातो. डॉ. अजित्या नावाच्या एका युजरने @DoctorAjayita हँडलवरून ट्विट केले की, ‘महत्त्वाचा राष्ट्रीय प्रश्न… तुम्ही समोसे वरून खायला सुरुवात करता की खालून?” काही जणांनी अशी उत्तरे दिली आहेत हसून हसून तुमचं पोट दुखेल. त्याचबरोबर अनेकांनी डॉक्टरांना ट्रोलही केलं आहे, ज्याला डॉक्टरांनीही अगदी सहज रिप्लाय दिला आहे.
लोकांना ही पोस्ट इतकी इंटरेस्टिंग वाटली की आतापर्यंत 76 हजारांहून अधिक लोकांनी ती पाहिली आहे. तर शेकडो लोकांनी त्याला लाइक केले आहे. यासोबतच नेटकऱ्यांनीही मजेशीर पद्धतीने प्रतिक्रिया दिल्या आहेत.
एका युजरने कमेंट केली की, “हे समोसाच्या तापमानावर गरम अवलंबून असते. तर आणखी एका युजरने म्हटले आहे की, ‘हा त्रिमुखी खाद्यपदार्थ आहे. कुठूनही खायला सुरुवात केली तरी त्याचा आनंद मिळतो.
A question of national importance…
Do you start eating your Samosa from the top or bottom? pic.twitter.com/5veq6P8f4J
— Dr. Ajayita (@DoctorAjayita) February 15, 2023
आणखी एका युजरने लिहिले की, “मी वरच्या भागावर केचप टाकून समोसे खातो. आणखी एका युजरने लिहिले की, ‘तुम्हाला २१ तोफांची सलामी मिळायला हवी.