मुंबई: जर तुम्हीही ऑप्टिकल इल्युजन किंवा ब्रेन टीझरचे फॅन असाल तर तुम्ही डुडासला चांगल्या प्रकारे ओळखत असाल. होय, ऑप्टिकल इल्युजन फोटो बनविण्यात माहिर असलेला हंगेरियन कलाकार डुडास! नुकताच त्याने फेसबुकवर ब्रेन टीझरचा नवा फोटो शेअर केला आहे, ज्याने जगभरातील पझल प्रेमींचे लक्ष वेधून घेतले आहे. नव्या चॅलेंजमध्ये त्यांनी लोकांना पांडा असणाऱ्या फोटोंमध्ये तीन कोल्हे शोधण्याचे काम दिले आहे. हे काम नेहमीप्रमाणेच सोपे नाही.
डुडासांचा हा भ्रम तुम्ही चुटकीसरशी मोडून काढू शकता असे वाटत असेल तर समजून घ्या की तुम्ही प्रतिभावंत आहात. हा टीझर अधिकच आव्हानात्मक आहे कारण कोल्ह्याचा रंग अगदी पांडासारखा आहे. अशा वेळी कोल्हे शोधणे म्हणजे भुश्यामध्ये सुई शोधण्यासारखे होईल. बरं, बघुया तुमचे डोळे किती तीक्ष्ण आहेत. 10 सेकंदात कोल्हे सापडतील की नाही?
आजचं काम थोडं अवघड आहे. आपण नक्कीच हे चित्र बघून डोकं खाजवत असाल आणि विचार करत असाल हे आम्हाला माहीत आहे. कारण या प्राण्यांचा रंग अगदी सारखाच आहे. मात्र, या कठीण आव्हानावर तुम्ही मात कराल, असे आम्हाला वाटते. हा ब्रेन टीझर फेसबुकवर शेअर करण्यात आला आहे. त्यानंतर हजाराहून अधिक लोकांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. याशिवाय या मनोरंजक चॅलेंजवर पझलप्रेमी सक्रियपणे कमेंट्स करत आहेत.
कोल्हे ओळखले असतील तर अभिनंदन, तुमची दृष्टी गरुडासारखी तीक्ष्ण आहे. जे लोक अजूनही त्यांचा शोध घेत आहेत त्यांच्यासाठी आम्ही खाली चित्र देत आहोत. खाली उत्तर दिलंय बघा.