‘पती, पत्नी और वो’ चा हाय व्होल्टेज ड्रामा! रंगेहात पकडलं, व्हिडीओ व्हायरल

| Updated on: Sep 27, 2022 | 12:20 PM

पती पत्नीची भांडणं होऊन पत्नी घर सोडून माहेरी निघून गेली. काही दिवसांनी पत्नीने पतीला हॉटेलात त्या महिलेसोबत पकडलं.

पती, पत्नी और वो चा हाय व्होल्टेज ड्रामा! रंगेहात पकडलं, व्हिडीओ व्हायरल
Husband Wife Viral
Image Credit source: Social Media
Follow us on

एका महिलेने आपल्या पतीला रंगेहात पकडलंय. आपल्या पतीचे अनैतिक संबंध असल्याचं पत्नीला माहित होतं. पण त्याचा कुठलाही पुरावा तिच्याकडे नव्हता. पती पत्नीची भांडणं होऊन पत्नी घर सोडून माहेरी निघून गेली. काही दिवसांनी पत्नीने पतीला हॉटेलात त्या महिलेसोबत पकडलं. दोघांनाही बदड बदड बदडलं! हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झालाय. हा व्हिडीओ बघून लोकांच्या संमिश्र प्रतिक्रिया येतायत. हा व्हिडीओ उत्तर प्रदेशातला आहे. या व्हिडिओत नुसता पतीनेच नाही तर त्या महिलेने सुद्धा प्रचंड मार खाल्लाय.

उत्तर प्रदेशातील आग्रा मध्ये हॉटेलच्या खोलीत एका पत्नीने पतीला दुसऱ्या महिलेसोबत रोमान्स करताना पकडलंय. त्या दोघांनाही पत्नीने चाबकाने मारलंय. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

देवरी रोड येथे राहणाऱ्या दिनेशवर पत्नी नीलमने एका महिलेशी अनैतिक संबंध ठेवल्याचा आरोप केला. याबाबत दोघांमध्ये खूप भांडण झाले. नीलम चिडून घर सोडून आपल्या माहेरी गेली.

आपला पती या महिलेसोबत दिल्ली गेटमधील एका हॉटेलमध्ये असल्याची माहिती निलमला मिळाली तिने लगेच आपल्या भावासोबत हॉटेलमध्ये धाव घेतली.

खोलीत गेल्यावर तिला दिनेश एका महिलेसोबत दिसला. रागाच्या भरात नीलमने पायातील चप्पल काढली, आधी पतीला आणि नंतर दुसऱ्या महिलेला बदड बदड बदडलं! मार खाताना नवरा माफी मागत राहिला, पण नीलमचे हात थांबले नाहीत!

व्हिडिओ

ही घटना घडत असताना नीलमच्या भावाने या घटनेचा व्हिडीओ बनवला. सोशल मीडियावर शेअर होताच हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला. या व्हिडिओत नीलमच्या पतीने आणि त्या महिलेने चप्पलने चांगलाच मार खाल्लाय.

तो म्हणतोय- चूक केली. हे पुन्हा होणार नाही. फक्त या वेळी क्षमा करा. तर दुसरी महिलाही नीलमची माफी मागताना दिसत आहे. ती देखील “असे पुन्हा होणार नाही. मला माफ करा” असं वारंवार म्हणतेय.

दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहचले. दिनेश आणि त्या महिलेला पोलीस ठाण्यात नेण्यात आले.