बायका, मुली ह्यांचं पार्लरशी असणारं नातं अनोखं आहे. या नात्यात कुणीच मध्ये पडू नये. जो या नात्यात मध्ये आला त्याचं काही खरं नसतं. नवराच काय कुणीच याबाबतीत कुठल्याही महिलेला सल्ला देऊ शकत नाही. असं केलंच तर मग महिला रौद्ररूप धारण करते. एक दिवस असंच झालं, एक माणूस दारू प्यायल्यावर बायकोला सल्ला द्यायला जातो. मग? मग काय बघा तुम्हीच!
कल्पना करा पती-पत्नीमध्ये भांडण होत असेल आणि ते घरात किंवा चौकात नाही तर ब्युटी पार्लरमध्ये होत असेल तर? तर काय विचारच करवत नाहीये. होना? असाच एक धक्कादायक प्रकार घडलाय.
या व्हिडिओची खास गोष्ट म्हणजे पत्नीने पतीला असा धडा शिकवला की बास्स. याचा एक व्हिडिओ एका युझरने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
यात एक स्त्री आपल्या पार्लरमध्ये काम करताना दिसते, पण तिचा मद्यपी नवरा येऊन ओरडू लागतो. पार्लरमध्ये बसलेल्या ग्राहकाचा तो पाठलाग करतो आणि पत्नीला काम बंद करण्यास सांगतो पण पत्नी त्याला रागवते.
Kalesh B/w Hausband and Wife inside Beauty Parlourpic.twitter.com/SlJXah325j
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) December 15, 2022
यानंतरही पती ऐकत नाही तेव्हा पत्नी त्याची कॉलर पकडून त्याला अतिशय जोरजोराने शिव्या देते. यानंतर बाई तिला काय हवंय ते सांगते आणि मग नवरा सांगतो की तिला 200 रुपये हवे आहेत.
मग बायको ते त्याला देते आणि पार्लरमध्ये अशा प्रकारे नाटक करू नका असं सांगते. सध्या हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.