मुंबई : आपल्या पाल्याला चांगलं शिक्षण मिळावं, त्याने चांगल्या ठिकाणी नोकरी करावी, वान कमावावं, असं प्रत्यक पालकाचं हे स्वप्न असतं. त्याने अधिकारी व्हावं, अशी अनेक पालकांची इच्छा असते. त्यासाठी ते वेगवेगळ प्रयत्न करत असतात. एका पालकाने आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी एका आयएएस (IAS) अधिकाऱ्याला पत्र लिहिलं आहे. त्याचं हे पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral Latter) होत आहे.
एका पालकाने आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी एका आयएएस अधिकाऱ्याला पत्र लिहिलं आहे. त्याचं हे पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका व्यक्तीने ट्विटरवर ट्विट करून आयएएस अधिकाऱ्याला पाल्याच्या भविष्या बाबत सवाल विचारला आहे. “जर तुम्हाला तुमच्या पाल्याला आयएएस बनवायचे असेल तर त्यासाठी काय करावं लागेल?, असं या व्यक्तीने विचारलं आहे. ‘माझी मुलगी पाचवीत शिकते आणि मला तिला आयएएस अधिकारी बनवायचं आहे. मला सांगा की मी तिला कसे शिक्षण द्यावं, जेणेकरून त्याला IAS अधिकारी बनण्यात यश मिळेल. कृपया मला काही मार्गदर्शन करा’, असं या व्यक्तीने आयएएस अधिकारी अवनीश शरण यांना विचारलं आहे. त्याचं हे पत्र अवनीश शरण यांनी ट्विट केलं आहे. हे पत्र सध्या व्हायरल होत आहे. यावर अवनीश यांनी “मी यावर काय उत्तर देऊ?’, असं म्हटलंय.
What should I reply to this message ? pic.twitter.com/tl5sOYP1op
— Awanish Sharan (@AwanishSharan) May 29, 2022
अवनीश शरण यांचे ट्विट व्हायरल होत असतात. याआधीही त्यांचं एक ट्विट व्हायरल झालं होतं. या व्हायरल ट्विटवर नेटकऱ्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. आयएएस अवनीश शरण यांनी केलं आहे. पहिल्या पगाराचा संदर्भ देत त्यांनी हे ट्विट केलंय. “तुम्ही तुमच्या पहिल्या पगाराचं काय केलं किंवा करणार आहात?”, त्यावर नेटकऱ्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. आपले अनुभव सांगितले आहेत.अवनीश शरण यांच्या ट्विटवर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.एकाने लिहिलंय की मी माझा पहिला पगार माझ्या आई-वडिलांना समर्पित करेल. तर काहींनी सांगितलंय की गरजूंना मदत करेल.
अपनी पहली ‘सैलरी’ से आपने क्या किया/ करेंगे ?
— Awanish Sharan (@AwanishSharan) May 15, 2022