IAS Tina Dabi: 2015 बॅचच्या IAS टीना डाबी (IAS Tina Dabi) यांचे दुसरे लग्न आणि गोव्यातील हनीमूनमुळे यामुळे सध्या त्या चर्चेत आहे. कालच टीना डाबींने पती प्रदीप गावंडेसोबत (IAS Pardip Gawande) सुट्टीचा आनंद लुटतानाचे अनेक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले होते. सध्या इंटरनेटवर फक्त टीना डाबी झळकतायत. आता त्यांनी त्यांच्या चाहत्यांना नवीन आनंदाची बातमी दिली आहे. ही आनंदाची बातमी तिच्या नवीन पोस्टिंगबद्दल आहे. IAS टीना डाबी यांची जैसलमेरमध्ये जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याची माहिती त्यांनी स्वतः त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून (Social Media Account) दिली आहे. काल टीना डाबी यांनी बुधवारी ट्विटरवर स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये त्या ऑफिसमध्ये बसलेल्या दिसत आहेत. आता या पोस्टवर त्यांचे चाहते त्यांचं जोरदार अभिनंदन करत आहेत. काही तासांत सुमारे 38 हजार लोकांनी याला लाईक केलं होतं.
यापूर्वी टीना डाबी या जयपूरमध्ये वित्त विभागात सहसचिव म्हणून कार्यरत होत्या. आता त्यांची पोस्टिंग जैसलमेर जिल्ह्यात झाली आहे. इथे त्या कलेक्टरची जबाबदारी पार पाडणार आहे. खुद्द टीना डाबींने ट्विटर आणि त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर ही माहिती दिली आहे. त्यांचे पती प्रदीप गावंडे हे देखील IAS आहेत. त्यांची पोस्टिंग उदयपूरमध्ये झाली आहे.
Joined as District Collector and Magistrate Jaisalmer today. ?? pic.twitter.com/oFKRkKTfUf
— Tina Dabi (@dabi_tina) July 6, 2022
Congratulations ma’am
— Himanshu Kaushik, IAS (@HimanshuK_IAS) July 6, 2022
Congratulations ? and All the best @dabi_tina Ji
— Yogita Bhayana योगिता भयाना (@yogitabhayana) July 6, 2022
यूपीएससी टॉपर IAS अधिकारी टीना डाबी यांचा घटस्फोट आणि त्यानंतर महाराष्ट्रातील IAS आधिकाऱ्याशी त्यांची जुळलेली प्रेमकाहणी ही देशभर गाजली. काही दिवसांपूर्वीच टीना डाबी यांनी मूळचे महाराष्ट्रातील, राजस्थानमधील कार्यरत आयएएस अधिकारी प्रदीप गवांडे यांच्याशी लग्न केलं. टीना डाबी यांचे पहिले पती अतहर आमिर खान हेही आता दुसरं लग्न करणार आहेत.अतहर आमिर खान हे मूळचे काश्मीरमचे आहेत. तसेच त्यांची होणारी पत्नी महरीन काझी याही काश्मीरच्याच आहेत. अतहर आमिर खान यांना आपलं प्रेम हे काश्मीरातच मिळालं आहे. तर टीना डाबी या महाराष्ट्राची सून झाल्या आहेत.