टीना डाबी (Tina Dabi) या राजस्थानमधील जैसलमेरमध्ये डिस्ट्रिक्ट मजिस्ट्रेट या पदाची जबाबदारी सांभाळत आहेत. 2015 साली जेव्हा त्या यूपीएससीमध्ये अव्वल आल्या होत्या तेव्हापासून त्या चर्चेत आहेत. त्यानंतर केवळ युपीएससीच (UPSC) नाही तर त्यांचं पहिलं लग्न असो, घटस्फोट असो किंवा दुसरं लग्न अशा अनेक कारणांमुळे त्या सतत चर्चेत होत्या. टीना डाबींनी आयएएस प्रदीप गावंडे (IAS Pradip Gawande) यांच्याशी दुसरं लग्न केलं. प्रदीप गावंडे हे 2013 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.
आयएएस अधिकारी टीना डाबी यांचं हे प्रकरण जुनं आहे पण तरी त्यांच्याविषयी जाणून घेण्याची उत्सुकता लोकांमध्ये नेहमीच असते. लेडी श्री राम कॉलेज (एलएसआर) मध्ये अव्वल स्थान पटकावतानाचा हा एक किस्सा अजूनही लोकप्रिय आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगाची टॉपर बनल्यानंतर टीना डाबी महिला श्री राम कॉलेजमध्ये परतली आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला. खचाखच भरलेल्या प्रेक्षागृहाला संबोधित करताना टीना डाबी यांनी असा एक किस्सा बोलून दाखवला होता, जो ऐकल्यानंतर अनेक विद्यार्थिनींना प्रेरणा मिळाली.
कॉलेजच्या ऑडिटोरियममध्ये आयएएस म्हणून परतलेली टीना डाबी म्हणाल्या, मला माझ्या हाताखालच्या लोकांसाठी खूप चांगलं उदाहरण घालून द्यायचं आहे. एक महिला म्हणून मी स्वतः महिलांशी संबंधित विषयांवर काम करू इच्छिते.
मला शिक्षण क्षेत्रावरही लक्ष केंद्रित करायचे आहे. मी माझ्या जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना भेट देईन आणि मुलींना जे काही भेदभाव सहन करावे लागतायत त्यांच्याशी लढा देईन. त्यांना जे हवे आहे ते साध्य करण्यासाठी प्रेरित करत राहीन.
प्रचंड गर्दी असलेल्या त्या सभागृहात विद्यार्थ्यांच्या टाळ्यांचा गजर ऐकू येत होता. डाबी यांनी 2014मध्ये लेडी श्रीराम महाविद्यालयातून राज्यशास्त्र (ऑनर्स) या विषयात पदवी प्राप्त केली.
कॉलेजचे कौतुक करताना डाबी म्हणाली होती की, एलएसआरने तिला ती कोण आहे हे दाखवून दिले. पुरोगामी विचारांचे बनविले. एलएसआर आपल्याला नेता बनवते. त्यामुळे या क्षणाचा फायदा घेऊन संधीचा लाभ घ्या आणि आयुष्यात तुम्हाला जे व्हायचे आहे ते व्हा.
आपण स्त्रिया आहोत पण हे जग पुरुषांचं आहे! त्यामुळे तुम्हाला या सगळ्याशी लढण्याची तयारी ठेवावी लागेल.