स्वयंपाक केल्यावर स्वयंपाकघर साफ करणे वाटत असेल डोकेदुखी, तर वापरा ‘या’ सोप्या ट्रिक्स

| Updated on: Nov 23, 2024 | 7:30 AM

घराचा आरसा म्हणजेच स्वयंपाकघर असते. पण अनेकदा काही कारणांमुळे महिलांना स्वयंपाक घर नीटनेटके ठेवता येत नाही. या काही सोप्या ट्रिक्सने तुमचे स्वयंपाक घर स्वच्छ आणि नीटनेटके ठेवण्यास तुम्हाला मदत होईल.

स्वयंपाक केल्यावर स्वयंपाकघर साफ करणे वाटत असेल डोकेदुखी, तर वापरा या सोप्या ट्रिक्स
kitchen
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

आपल्या घरातील सर्वात महत्त्वाचा भाग कोणता असेल तर ते म्हणजे घरातील किचन म्हणजेच स्वयंपाकघर आहे. स्वयंपाकघरामुळे घराला शोभा येते. प्रत्येकाला स्वच्छ स्वयंपाकघर असावे असे वाटते. हे तुमच्या घराचे सौंदर्य तर वाढवतेच पण त्यासोबत आरोग्य चांगले ठेवण्यास देखील मदत करते. स्वयंपाक घरात काम करताना स्वयंपाकघर अनेकदा पूर्णपणे विखुरले जाते. त्याशिवाय वेळेची कमतरता असल्यामुळे अनेक महिलांना स्वयंपाक घर व्यवस्थित सांभाळता येत नाही. अशा परिस्थितीत स्वयंपाक पूर्ण केल्यानंतर अनेकदा स्वयंपाकघर विखुरलेलेच राहते.

स्वयंपाक केल्यानंतर आलेल्या थकवांमुळे अनेकदा महिला स्वायंपाकघर स्वच्छ करणे टाळतात. अशा परिस्थितीत काही टिप्स आणि ट्रिक्सच्या मदतीने तुम्ही कामासोबतच तुमचे स्वयंपाक घर ही सांभाळू शकता.या टीप चा अवलंब करून तुम्हीच स्वयंपाक करताना स्वयंपाकघर एका बाजूने स्वच्छ करू शकता आणि तुमचे स्वयंपाक घर शेवटपर्यंत स्वच्छ आणि नीटनेटके राहील. अशाच काही सोप्या टिप्स बद्दल जाणून घेऊया.

भांडे घासायला टाका

खरकटी भांडी पाण्यात भिजवून किचन ओट्यावर किंवा बेसिंग मध्ये टाका आणि त्यावर पाणी टाकून ठेवा. जेणेकरून साचलेली घाण साफ करण्यास वेळ वाया जाणार नाही. पाण्याने घाण पाण्याने फुगून जाईल आणि ती सहज साफ करता येईल तोपर्यंत तुम्ही तुमची इतर कामे करू शकतात.

डस्टबिन तुमच्याजवळ ठेवा

कचरा टाकायला वारंवार डस्टबिन मध्ये जाण्यास आपल्या वेळ वाया जातो आणि त्यासाठी जास्त मेहनतही घ्यावी लागते. म्हणून स्वयंपाक घरात डस्टबिन नेहमीच जवळच ठेवा जिथे तुम्ही सहजपणे कचरा त्वरित टाकू शकतात आणि तो इतरत्र कुठेही जमा होणार नाही. जर तुमच्या किचन ट्रॉलीमध्ये तुम्ही डस्टबिन ठेवली असेल तर ट्रॉली उघडीच ठेवा जेणेकरून तुम्हाला कचरा टाकण्यास सोपे जाईल.

किचन ओटा लगेच साफ करा

मसाल्याच्या डबा उघडल्यानंतर तो लगेच बंद करून जागेवर ठेवा तसेच ओट्यावर असलेल्या इतर वस्तू लगेच जागेवर ठेवण्याची सवय करा. जेणेकरून वस्तू एकत्र होणार नाहीत याशिवाय अतिरिक्त पसरलेल्या वस्तू जागेवर ठेवल्याने पसाराही दिसणार नाही.

एका ठिकाणी लक्ष केंद्रित करा

एकाच वेळी संपूर्ण स्वयंपाकघर स्वच्छ करण्याऐवजी एक क्षेत्र निवडा आहे ते आधी पूर्णपणे स्वच्छ करा. कोणतेही एक क्षेत्र किचन, ओटा, गॅस, किचन ट्रॉली, भांडे, फरशी, बेसिन इत्यादी पैकी एकच सर्वप्रथम स्वच्छ करा. त्यामुळे तुम्हाला मानसिक शांती देखील मिळेल.

दुर्गंधी दूर करा

दुर्गंधी निर्माण करणाऱ्या वस्तू उघड्या ठेवू नका अंडी, भाज्यांची साले इत्यादी वस्तू गोळा केल्यानंतर त्या लगेचच बाहेर फेकून द्या. कारण त्यामुळे दुर्गंधी सुटते त्यासोबतच बेकिंग सोडा किंवा पांढरा व्हिनेगर वापरून डस्टबिन स्वच्छ करा.