अपघात, अनोळखी व्यक्तींना धडक, पायऱ्या उतरून खाली कोसळणे . ही एक वाढती चिंताजनक समस्या आहे ज्यासाठी आपण स्वत: जबाबदार आहोत, कारण मोबाइल हा आपल्या जीवनातील एक अतिशय महत्वाचा भाग बनला आहे आणि या मोबाइल मुळेच अशा समस्या उद्भवतात. मोबाइल फोनची आवडही आपल्यासाठी घातक आहे. आपण बरेचदा चालताना आणि गाडी चालवताना लोकांना मेसेज करताना बघतो. हे किती वाईट आहे आणि हे वेळीच रोखलं गेलं पाहिजे हा मुद्दा दिल्ली पोलिसांनी ठळकपणे मांडलाय. याविषयी जनजागृती करण्यासाठी दिल्ली पोलिसांनी एक व्हिडीओ शेअर केलाय.
दिल्ली पोलीस विभागाने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये काही लोक मोबाईल फोनचा वापर करून चालत आहेत आणि अपघाताचे बळी ठरतात.
अनेक उदाहरणांनंतर त्यांनी गाडी चालवताना फोन चालवणारी, मोबाइल वापरताना अपघाताची शिकार झालेली महिला याचे उदाहरण दिले.
दिल्ली पोलिसांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘कहीं पे निगाहें, कहीं पे निशाना’ धोकादायक ठरू शकते. दिल्ली पोलिसांनी मोबाइल फोनचा वापर करून रस्ते सुरक्षेबाबत धडा देणारा एक व्हिडिओ शेअर केलाय ज्यात मेसेजिंग आणि चालताना लोक मोठ्या अपघातांचे बळी ठरतायत.
‘कहीं पे निगाहें, कहीं पे निशाना’ खतरनाक हो सकता है।
वाहन चलाते समय ध्यान सिर्फ सड़क पर रखें, मोबाइल पर नहीं।#DelhiPoliceCares #RoadSafety pic.twitter.com/u1ylBANjXy
— Delhi Traffic Police (@dtptraffic) November 7, 2022
फोन वापरताना लोक योग्य प्रकारे चालू शकत नाहीत तर गाडी कसे चालवणार असं ठळकपणे सांगण्यात आलंय. 7 नोव्हेंबर रोजी पोस्ट केलेल्या या व्हिडिओला 15,000 हून अधिक व्ह्यूज आणि 100 हून अधिक रिट्विट मिळाले आहेत. अनेकांनी या महत्त्वपूर्ण संदेशाचे कौतुक करत आपली मतं मांडलीत.