आता बहुतेक लोकांना लक्झरी लाइफ जगायला आवडतं. त्यासाठी ते भरपूर पैसे कमावण्याचा प्रयत्न करतात आणि कधी कधी नैतिक आणि अनैतिक यातील फरक विसरून जातात. आजकाल साधू असलेल्या एका माणसाची गोष्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण हे साधू एकेकाळी आयआयटी दिल्लीचे टॉपर्स राहिलेले आहेत. आपण असं का केलं याचं कारण आता या व्यक्तीनं सांगितलंय.
ही व्यक्ती मॅनेजरपासून साधू बनलीय. मूळचे बिहारचे असलेले संदीपकुमार भट्ट यांनी 2002 मध्ये आयआयटी दिल्ली येथून बीटेक केले. ते त्यांच्या बॅचचे सुवर्णपदक विजेते होते.
2004 मध्ये त्यांनी एमटेकही केलं होतं. अभ्यासक्रम पूर्ण करताच त्यांनी एका मोठ्या कंपनीत मॅनेजर म्हणूनही काम केले. पण मग असं काय झालं की त्याचं जगाबद्दलचं आकर्षण संपलं आणि त्याने संन्यासीचा मार्ग स्वीकारला. नुकतंच त्यांनी एका मुलाखतीत याबाबत सांगितलंय.
मीडिया रिपोर्टनुसार, संदीप कुमार भट्ट यांनी वयाच्या 28 व्या वर्षी निवृत्ती घेतली. 2007 मध्ये ते साधू झाले. साधू झाल्यानंतर ते स्वामी सुंदर गोपालदास म्हणून ओळखले जाऊ लागले.
याबाबत बोलताना स्वामी सुंदर गोपालदास स्वत: सांगितात की, इंजिनीअर, डॉक्टर, आयएएस, न्यायाधीश, शास्त्रज्ञ, नेते समाजात अनेक सापडतील. समाजाला वेगळा मार्ग दाखवणं किंवा लोकांचं चारित्र्य घडवणं असं ध्येय ठेवणारी माणसं सापडणार नाहीत.
समाजात पसरलेल्या चुकीच्या गोष्टी दूर करण्यासाठी धार्मिक शिक्षण हा एकमेव मार्ग आहे, असं मत ते व्यक्त करतात.
स्वामी सुंदर गोपालदास म्हणतात नोबेल पारितोषिक मिळणं ही काही फार मोठी गोष्ट नाही, पण बिघडलेल्या माणसाला सुधारणं हे फार मोठं काम आहे.
यंत्राचा दर्जा वाढत चाललाय, पण माणसाचा दर्जा मात्र कमी होत चाललाय आहे असं मत स्वामी सुंदर गोपालदास यांचं आहे.
सुशिक्षित लोकांनी संत बनले पाहिजे, असेही त्यांचे म्हणणे आहे. चांगला समाज वाढवायचा असेल तर असेल तर अशा लोकांनीही पुढे यायला हवे. यासाठीच मी संत मार्गाला लागलो असंही ते सांगतात.