America | उंदरांना मारण्यासाठी चक्क हेलिकॉप्टर! काय आहे नेमकं प्रकरण?

| Updated on: Dec 20, 2021 | 5:43 PM

अमेरिकेत एक वाईल्डलाईफ सर्विस काम करते. तिचं नाव आहे, एफडब्ल्यूएस! एफडब्ल्यूएस म्हणजे फिश एन्ड वाईल्डलाईफ सर्विस होय. एफडब्ल्यूएसनंच उंदरांना मारण्यासाठी हेलिकॉप्टर वारण्याचा प्रस्ताव दिला होता.

America | उंदरांना मारण्यासाठी चक्क हेलिकॉप्टर! काय आहे नेमकं प्रकरण?
प्रातिनिधिक फोटो
Follow us on

अमेरिकेच्या कॅलिफॉर्नियात (California) असलेल्या एका बेटावर चक्क हेलिकॉप्टरची मदत उंदराना मारण्यासाठी घेण्यात येणार आहे. उंदीर मारण्यासाठी चक्क हेलिकॉप्टरच्या मदतीनं विष फवारणी केली जाणार आहे. प्लेगचं (Plague) संकट ओढवण्याची भीती या बेटावर असल्यामुळे स्थानिक प्रशासनानं चक्क हेलिकॉप्टरमुळे (Helicopter) सरसकट विषभवारणी करत उंदरांना मारण्यासाठीचा फतवा काढलाय.

कोणत्या बेटावर करणार विषफवारणी?

अमेरिकेतल्या कॅलिफोर्नियात फरलॉन (Fairlawn) नावाचं एक बेट आहे. या बेटावर प्लेगचा संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त केली जाते आहे. त्यामुळे या बेटावर हेलिकॉप्टरनं विष फवारणी केली जावी, असा प्रस्ताव सुरुवातीला देण्यात आला होता. काही काळ या प्रस्तावावर वादळी चर्चा झाली. अनेक निसर्गप्रेमींनी या प्रस्तावाला विरोध दर्शवला होता. अखेर आता हेलिकॉप्टरनं विषफवारणी करण्याला मान्यता देण्यात आली आहे.

कुणी दिला होता प्रस्ताव?

अमेरिकेत एक वाईल्डलाईफ सर्विस काम करते. तिचं नाव आहे, एफडब्ल्यूएस! एफडब्ल्यूएस म्हणजे फिश एन्ड वाईल्डलाईफ सर्विस होय. एफडब्ल्यूएसनंच उंदरांना मारण्यासाठी हेलिकॉप्टर वारण्याचा प्रस्ताव दिला होता. सुरुवातील स्थानिक पर्यावरणवाद्यांनी या प्रस्तावाला प्रचंड विरोध केला. सरसकट विषफरवणाणीमुळे उदरांसोबतच अन्य वन्य प्राण्यांच्याही जिवाला धोका निर्माण होण्याची भीती पर्यावरण वाद्यांनी व्यक्त केली होती.

वाढत्या विरोधामुळे अखेर या आयोग स्थापण्यात आला. या आयोगानं हेलिकॉप्टरनं फवारणी केली जावी की केली जाऊ नये, यावरुन मतदान घेतलं. त्यात फवारणी केली जावी, या बाजूनं मतदार केलं गेलं. 5-3 या फरकानं अखेर झालेल्या मतदारामुळे हेलिकॉप्टरनं विषफवारणी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

कधी केली जाणार फवारणी?

फरलॉन बेटावरवरील संशोधकंनी तातडीनं उंदरांना मारण्यासाठी कडक पावलं उचलण्याची गरज व्यक्त केली आहे. इतर स्थानिक प्रजातींसाठी उंदरं धोकादायक असल्याचं त्यांनी म्हटलंय. दरम्यान, जर एफडब्ल्यूएसनं मान्यता दिली तर सेंट फ्रान्सिंस्कोपासून जवळपास असलेल्या बेटांवरही 2023 पर्यंत हेलिकॉप्टरनं विष फवारणी केली जाईल, अशी शक्यता वर्तवली जाते आहे.

इतर बातम्या –

Video | थरारक! भाऊ पाचव्या मजल्यावर आगीत अडकला होता, बहिणीच्या धाडसामुळे थोडक्यात वाचला

Video | Hair cutting | तुम्ही म्हणाल ही तर ‘गॉन केस’? पण तसं नाहीए, शिवा 20 कैच्या हातात घेऊन कापतो केस

Viral | ढसाढसा रडत व्हायोलीन वाजवत असलेल्या मुलाची काळीज पिळवटून टाकणारी हृदयस्पर्शी गोष्ट

Surprising | जाळं टाकलं माशांसाठी, गळाला लागले चक्क असंख्य आयफोन!