‘बंगले के पीछे तेरे, तेरी बेरी के नीचे,कांटा लगा…’; गर्दीने खचाखच भरलेल्या मुंबई लोकलमध्ये आजोबांचा धम्माल डान्स

| Updated on: Oct 22, 2024 | 2:59 PM

मुंबई लोकलमधील कित्येक व्हिडीओ रोज व्हायरल होत असतात. असाच व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एका आजोबांनी कांटा लगा गाण्यावर भन्नाट डान्स केल्याच पाहायला मिळत आहे.

बंगले के पीछे तेरे, तेरी बेरी के नीचे,कांटा लगा...; गर्दीने खचाखच भरलेल्या मुंबई लोकलमध्ये आजोबांचा धम्माल डान्स
Follow us on

Mumbai Local Viral Video : मुंबई लोकल म्हटंल की डोळ्यांसमोर येते ती गर्दी, धक्काबुक्की, ती लोकल पकडण्यासाठी प्लॅटफॉर्मवर धावणारे प्रवासी, खचाखच भरलेला लोकलचा डबा, सीटसाठी चालेली भांडणे, वाद गरमीनं हैराण झालेले प्रवासी अगदी सगळं काही असं समोर दिसतं. लोकलने प्रवास करणारे प्रवासी हे रोज करतात. त्यांची ही तारेवरची कसरत नेहमीचच असते. पण लोकलमधला अजून एक अनुभव सगळेच प्रवासी अनुभवतात तो अर्थातच सर्वांसाठी सुखद असतो तो म्हणजे मैत्री. रोज त्याच वेळेला, त्याच डब्यात प्रवास करणाऱ्या प्रवाशांची काहीही ओळख नसताना एकमेकांशी झालेली मैत्री. मग अगदी डबा शेअर करण्यापासून ते खाजगी आयुष्य़ातील किस्से, अडचणी शेअर करण्यापर्यंत आलेला तो सहजपणा सगळंच जुळून येतं. याचिच प्रचिती देणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे.

mumbai local dance

भर गर्दीत बॉलिवूड गाण्यावर डान्स

मुंबई लोकलमध्ये केल्या जाणाऱ्या आरत्या आणि भजनांचे व्हिडीओ एवढच काय मारामारी आणि भांडणांचे व्हिडीओसुद्धा तुम्ही अनेकदा पाहिले असतील. पण मुंबईलोकलमधील व्हायरल झालेला हा व्हिडीओ थोडा हटके आहे. हा व्हिडीओ मुंबई लोकलमधील पुरुषांच्या डब्यातील आहे. या डब्यात प्रवाशांची गर्दी अगदी नेहमीप्रमाणेच होती. खरं तर ही लोकं ऑफिसचं काम करून थकलेली आहेत. पण आपला थकवा सगळं विसरून आनंदाच्या क्षणांसाठी भन्नाट मार्ग शोधून काढलेला दिसत आहे. या व्हिडीओमध्ये एक आजोबा कांटा लगा या गाण्यावर मंत्रमुग्ध होऊन डान्स करत आहेत. आणि त्यांना पाहून इतरही त्यांना साथ देत आहेत. मुळात म्हणजे या आजोबांना साथ देणार हे बऱ्यापैकी त्यांच्याच वयाचे दिसून येत आहेतय.

मुंबई लोकलमधील हा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. ‘मुंबई हेरीटेज’ या ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये प्रवासी भर गर्दीत कांटा लगा गाण्यावर धम्माल डान्स करताना दिसत आहे.तसेच इतर प्रवासी हिंदी गाणी गात डान्स करताना दिसताहेत. दरम्यान कोणी बाकडी वाजवून तर कोणी खिडकीच्या काचा वाजवून गाण्याची रंगत आणखी वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. सगळं टेंशन विसरून हे प्रवासी ज्या पद्धतीने मनोरंजन करत आहेत त्यानुसार आनंदी राहाण्याचा यापेक्षा दुसरा मार्ग तो काय असणार.

नेटकऱ्यांकडून कौतुक

प्रवाशांचा हा धम्माल व्हिडीओ पाहून मुंबई लोकलमधील प्रवाशांचं तर मनोरंजन झालं पण सोशल मीडियावरील नेटकऱ्यांचेही मनोरंजन नक्कीच झालं आहे. कारण या व्हिडीओवर लाईक्स आणि रंजक अशा कमेंटसचा वर्षाव झालेला पाहायला मिळतोय. तसेच सोशल मीडियावर या व्हिडीओला प्रचंड प्रमाणात पसंती मिळाली आहे. तसेच कोणत्याही परिस्थितीत आनंदी कसं राहायचं हे खरोखरचं मुंबईकरांकडून शिकण्यासारखं आहे एवढं नक्की.