मुंबई : सोशल मीडियावर (Social media) कधी काय व्हायरल (viral video) होईल, हे कुणीचं सांगू शकत नाही. त्याचबरोबर लोकं कोणत्या गोष्टीवरुन कधी काय करतील हे सुध्दा सांगता येत नाही. लोकं अशा गोष्टीवरुन राडा करतात की, त्याचा व्हिडीओ चर्चेचा होऊन जातो. लग्नात अनेकदा छोट्या छोट्या गोष्टीवरुन राडा होत असल्याचं पाहायला मिळत आहे. काहीवेळेला काठीने मारहाण केल्याचा सुध्दा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. अशीचं एक घटना नुकतीचं पाकिस्तानमध्ये (pakistan) घडली आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवरती व्हायरल झाला आहे. ही गोष्ट इतकी छोटी आहे की, तुम्हाला सुध्दा या गोष्टीमुळे धक्का बसणार आहे.
सध्या व्हायरल झालेलं प्रकरण असं आहे की, एका व्यक्ती लग्नात जेवत असताना त्याला मटणाचा तुकडा सापडला नाही, त्या व्यक्तीने तिथं राडा घालायला सुरुवात केली. त्या व्हिडीओत तुम्हाला दिसत असेल हॉलच्या मधोमध एक पांढरा पडदा लावला आहे. त्याच्या एका बाजूला एक महिला जेवण करीत आहे. तर दुसऱ्या पुरुष लोकं जेवण करीत आहेत.काही लोकं शांततेत जेवण करीत आहेत. तर काही लोकं मस्ती करीत आहेत. जी लोकं मस्ती करीत आहेत. ती मस्ती इतकी वाढली आहे की, तिथं हाणामारी झाली आहे. त्यानंतर तिथं मोठी हाणामारी झाली आहे. खूपवेळ मारामारी झाल्यामुळे लोकं सुध्दा अधिक परेशान झाले आहेत.
ज्या व्यक्तीने हा व्हिडीओ शेअर केला आहे, त्यांनी हा व्हिडीओ पाकिस्तान देशातील असल्याचं सांगितलं आहे. तिथं लग्नाचं रिसेप्शन सुरु असताना एका व्यक्तीला मटणाचे तुकडे मिळालेले नाहीत. त्यामुळे त्या व्यक्तीने मोठा राडा केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर @gharkekalesh नावाच्या एका व्यक्तीने शेअर केला आहे. सध्या व्हायरल झालेला व्हिडीओ ६ मिनिट ३७ सेंकदाचा आहे. या व्हिडीओला आतापर्यंत तीन लाख लोकांनी पाहिलं आहे. त्याचबरोबर अनेक लोकांनी त्या व्हिडीओला लाईक सुध्दा केलं आहे.
Kalesh during marriage ceremony in pakistan over mamu didn’t got Mutton pieces in biriyani pic.twitter.com/mYrIMbIVVx
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) August 29, 2023
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांच्या विविध प्रकारच्या कमेंट सुध्दा आल्या आहेत. एका व्यक्तीने मजेदार कमेंट केली आहे. असा प्रकार फक्त पाकिस्तानमध्ये होऊ शकतो.